युवा उद्योजकांनी आर्थिक निर्देशांकाचा, अभ्यास केला पाहिजे अनमोल कांबळे मुंबईतील कार्यक्रमात व्यक्त केली भावना…!



युवा उद्योजकांनी आर्थिक निर्देशांकाचा, अभ्यास केला पाहिजे अनमोल कांबळे मुंबईतील कार्यक्रमात व्यक्त केली भावना.

प्रतिनिधी मुंबई

सर्व सामान्य माणूस आपले नशीब चंमकवायला मुंबईला येतो परंतु मुंबईला देशाच्या आर्थिक निर्देशांकां ची इमारत आहे इमारतीमध्ये येण्याकरिता सर्व सामान्यांना बंदी आहे फार कडक सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून नियमावली आहे व ती पाहिजे परंतु तुम्ही जर का पाहिल तर इमारतीच्या आत मध्ये उड्या मारणाऱ्या बैलाचे चित्र आहे बैलाने उसळी घेतली की आर्थिक निर्देश अंक उंचावतो आणि बैलाने मान खाली घातली की आर्थिक निर्देशां अंक मंदावतो हि इतली अर्थ व्यवस्था देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्याचं काम करते आणि आज या अशा देशाच्या सर्वोच्च आर्थिक निर्देशांकांच्या ठिकाणी इमारतीमध्ये व्यासपीठावरती मला बोलण्याची मान्यवरांनी संधी दिली त्यांचा मी ऋणी आहे. प्रत्येकाने आर्थिक बाजारामध्ये पैसे गुंतवले पाहिजेत आर्थिक बाजार हा काय आहे हे शिकलं पाहिजे त्याचे उतार चढाव काय आहेत हे पाहिलं पाहिजे कारण तुमचा आर्थिक उतार चढाव तुमचे भविष्य ठरवणार आहे याची जान प्रत्येकाला असली पाहिजे असे अनमोल कांबळे यांनी मुंबईतील कार्यक्रमात बोलताना सांगितले.