प्रतिनिधी अनमोल कांबळे
अनिल देसाईंच्या प्रवेशाने अजित दादांच्या राष्ट्रवादीची मान खटाव तालुक्यात आणखी ताकद वाढणार.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व मान खटाव चे नेते अनिल भाऊ देसाई हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत रविवार दिं २४ ऑगस्ट रोजी अजित दादांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करणार असून पक्षाला याचा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे अनिल देसाई यांच्या पाठीमागे मान खटाव मधील मोठा जनसमुदाय उभा असून भविष्यामध्ये पक्षाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार असल्याचे दिसून येत आहे, व या होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन काका पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती असून रविवार दिनांक २४ रोजी दुपारी दोन वाजता दहिवडी बाजार पटांगण या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार असून जास्तीत जास्त ताकतीने कार्यक्रमातला उपस्थित रहावे असे आयोजकांकडून कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात आले आहे.

