कोथरूड मध्ये घडलेली घटना वेदनादायी पोलीस खात्यात कार्यरत असताना instagram facebook वरती अश्लीलतेचा प्रचार करणाऱ्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील बाईला पोलीस सेवेतून निलंबित करा पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड.!



प्रतिनिधी सातारा

कोथरूड मध्ये घडलेली घटना वेदनादायी पोलीस खात्यात कार्यरत असताना instagram facebook वरती अश्लीलतेचा प्रचार करणाऱ्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील बाईला पोलीस सेवेतून निलंबित करा पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड.

कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील यांनी औरंगाबाद येथील मिसिंग घटनेच्या अनुषंगाने कसलाही संबंध नसताना तीन मुलींना ताब्यामध्ये घेतले कोर्टाच कुठलही सर्च वॉरंट परवानगी नसताना तीन मुलींना ताब्यात घेऊन तुम्ही महार मांग जातीच्या असून वेश्या व्यवसाय करता का? अशा शब्दात वर्तन केल्याने व सदरचा व्हिडिओ हा मुलींनी कडून पब्लिक झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे, व पुन्हा एकदा पोलिसांवरती व पोलिसांच्या एकतर्फी धोरणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, याचेच पडसाद राज्य सह साताऱ्यात देखील उमटले असल्याचे पाहायला मिळाले आहे, ऑल इंडिया पॅंथर सेनेने सातारा येथे या घटनेचा निषेध करत जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, आदित्य गायकवाड म्हणाले प्रेमा पाटील या पोलीस असल्याने त्या मॉडेल देखील आहेत व विश्वसुंदरीचा त्यांना लोकल गल्लीतला एक पुरस्कार देखील मिळालेला असल्याचे समजत आहे, प्रेमा पाटील यांनी खाकी वर्दी अंगावरती घालून पोलीस खात्याला बदनाम करत अश्लीलतेचा प्रचार राज्यभर सुरू केला आहे, काल घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून वेदनादायी आहे या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सोमवार दिनांक 4/8/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदवणार आहोत व तात्काळ प्रेमा पाटील या PSI यांना पोलीस खात्यातील सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी मागणी देखील करणार आहोत प्रेमा पाटील यांची गरज महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला नसून गावोगावी होणाऱ्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमातील आपले नाट्य सिंगार साजरा करणे करिता आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे समाजाला जर का कोणी तुच्छ समजत असेल तर त्याला पॅंथर महिला आघाडी जशास तसे रोडवरती उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले.‌