सांगली अनिकेत कोथळे पोलीस कोठडी मारहाण व हत्याकांड प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲड विकास पाटील शिरगावकर यांच्या कडून नवे दावे शिरगांवकरांनी सादर केला बचावा करिता कागदोपत्री नवा साक्षी-पुरावे…
प्रतिनिधी अनमोल कांबळे
सांगली,अनिकेत कोथळे हत्याकांड प्रकरणात खटला क्र. ३३/२०१८ मध्ये बचाव पक्षाने साक्षी-पुरावे सादर केल्याने या खटल्याला आता नवे वळण लागले असल्याचे आज दिसून आले आहे दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात चालू असलेल्या खटला क्र. ३३/२०१८ मध्ये आज एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या अनिकेत कोथळे प्रकरणात, बचाव पक्षा तर्फे आरोपी,बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांची आज साक्ष घेण्यात आली बचाव पक्षाच्या वतीने ॲड. विकास पाटील शिरगांवकर,यांनी सादर केलेल्या साक्षी आणि पुराव्यांमुळे खटल्याला वेगळेच वळण मिळाले असल्याचे दिसून आले आहे, युवराज कामटे यांनी स्पष्टपणे सांगितले की, गु.र.क्र. २३८/२०१७ मध्ये त्यांनी अनिकेत कोथळे याला अटक केली नव्हती, तसेच त्या प्रकरणाचा तपास त्यांच्या ताब्यात नव्हता. अटक पंचनाम्यावर त्यांची ना सही आहे, ना त्यांचे अक्षर आहे, असे त्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापूर्वक सांगितले असल्याने त्यांनी त्यांचे अक्षर आणि सहीचा नमुना तपासासाठी सादर करण्याची तयारी देखील दर्शवली. याशिवाय, बचाव पक्षाने माहिती अधिकारातून मिळवलेली कागदपत्रे सादर केली असून, पोलिसांनी बनावट पंचनामा तयार करून कामटे यांना खोटे अडकवले, असा गंभीर आरोप बचाव पक्षाचे वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी केला असल्याचे निदर्शनास आले इतकच नाही तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की, गु.र.क्र.२४३/२०१७ दाखल होण्यापूर्वीच मिरज पो. उपअधीक्षक धीरज पाटील हे ९ पोलीस कर्मचाऱ्यांसह मृतदेह आणण्यासाठी आंबोलीला गेले होते याची नोंद पोलीस मुख्यालयाच्या स्टेशन डायरीत आहे का? तसेच, युवराज कामटे हे ६ व ७ नोव्हेंबर २०१७ रोजी मिरज येथील शाळेत सूत्रसंचालनाच्या कार्यात हजर होते, याचाही पुरावा सादर करण्यात आला. तहसीलदार कार्यालयातून पंच रवाना झाल्याचे कोणतेही नोंदवहीत उल्लेख नसल्यामुळे तपास यंत्रणेने बनावट पत्र तयार केले, असा दावा देखील बचाव पक्षाच्या वतीने ॲड विकास पाटील शिरगावकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे या सर्व पुराव्यांवरून तपास यंत्रणेने मुद्दामून युवराज कामटे यांना या प्रकरणात अडकवले, असा गंभीर आरोप बचाव पक्षाने केला आहे या खटल्याची पुढील सुनावणी २२ एप्रिल २०२५ रोजी रोजी विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम यांनी आरोपी युवराज कामटे याचा,उलट तपास सुरू केला ,आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांनी युवराज कामटे यांची उलट तपासणी केली व त्यामध्ये पुढील महत्त्वाची विचारणा झाली तुम्ही कोणते वाहन वापरत होता? रॉयल एन्फिल्ड बुलेट तुम्ही वाहनामध्ये पेट्रोल संपल्या नंतर भरत होता का? नाही, गाडी रिझर्व्ह ला लागली की,भरत होतो तुमची बुलेट गाडी पोलिसांनी दि.९/११/२०१७ रोजी जप्त केली मला माहीत नाही तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा होता? सोनी कंपनीचा लॅपटॉप कोणाचा होता माझाच होता, तो हजर करू शकता का?सध्या हजर करू शकत नाही.तुम्ही मिरज येथे कार्यक्रमासाठी सांगली शहर पो. ठाण्यातून गेला होता ? खोटे आहे,मी माझ्या घरून गेलो होतो सदर कार्यक्रमात तुमच्या उपस्थितीचा पुरावा आहे का? होय, या कामी मी हजर असल्याचे दोन फोटो सादर केले आहेत (निशाणी क्र. ५७४, ५७५) ते फोटो तुम्ही मॅार्फ केलेले आहेत का? नाही ते मॅार्फ केलेले नाहीत सूत्रसंचलन म्हणजे काय? लोकांशी कसे वागावे हे शिकवणारा कार्यक्रम डीवायएसपी दिपाीली काळे सांगली शहरासाठी होत्या होय दि.६/११/१७ रोजी त्यांनी नाईट राऊंड होता मला माहीत नाही डीवायएसपी दिपाली काळे यांनी तुम्हाला फोन करून विचारले आरोपी कुठे आहेत? नाही डीवायएसपी दिपाली काळे यांना,तुम्ही फोन करून सांगितले अमोल भंडारेला घेऊन येत आहे नाही अमोल भंडारे व अनिकेत कोथळे लॅाकअप मध्ये नाहीत ?मला माहीत नाही.तुम्ही हस्ताक्षर नमुना द्यायला तयार आहात का वकीलांचा सल्ला घेऊन सांगतो ,त्यानंतर दुपारचे सत्रामध्ये न्यायालयात युवराज कामटे यांनी त्यांच्या हस्ताक्षर देणेस तयार आहे असा अर्ज सादर केला असून, यासंदर्भात पुढील उसटतपासणी ही ३ मे २०२५ रोजी होणार आहे या खटल्याचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे झाले असून, बचाव पक्षाने केलेले आरोप आणि सादर केलेले पुरावे या प्रकरणाला वेगळ्याच वळणावर नेत असल्याचे दिसून येत असून बचाव पक्षातर्फे विकास पाटील शिरगावकर फिर्यादीतर्फे राज्यात गाजलेले वकील ॲड उज्वल निकम काय बाजू मांडणार? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.

