ॲड विकास पाटील शिरगावकर यांची गोंदिया येथे पोलिसांकरिता होणाऱ्या मार्गेदर्शन कार्यक्रमाची उत्सुकता वाढली..!



ॲड विकास पाटील शिरगावकर यांची गोंदिया येथे पोलिसांकरिता होणाऱ्या मार्गेदर्शन कार्यक्रमाची उत्सुकता वाढली.

प्रतिनिधी सातारा

गोंदिया जिल्हा पोलीस अधिकारी यांना नवीन कायद्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पोलीस अधीक्षक,गोंदिया यांनी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक न्याय संहिता नवीन कायद्या संदर्भात पोलीस अधिकारी, अंमलदार यांना जुलै २०२४ पासून लागू झालेले फोजदारी कायदे व त्यातील कलमांचा वापर, तपास करताना कसा केला पाहीजे, या संदर्भात सातारचे तत्कालीन जिल्हा सरकारी वकील मा: विकास पाटील शिरगावकर यांना, मा.पोलीस अधीक्षक,गोंदिया यांनी, जिल्हा पोलिसांकरीता मार्गदर्शन करण्यासाठी विनंती केली असून, त्या विनंतीस मान देऊन ॲड विकास बा.पाटील- शिरगांवकर हे दि १३/४/२०२५ रोजी गोंदिया येथे न्यायालात काम चालविताना आलेले अनुभव,व त्या संदर्भात कायादालक सांगणे व त्याचा कायदेशीर अर्थ लावणे या साठी मार्गदर्शन करणार आहेत. सदरचे मार्गदर्शन हे पोलीस तपास यंत्रणेस आरोपीने गुन्हा केल्यास हे शाबित करणारा सबळ पुरावा दोषाराप पत्रा मध्ये असला पाहीजे या साठी पोलिसांना ॲड विकास पाटील शिरगावकर यांचे मार्गदर्शक गरजेचे ठरणार आहे, व याची उत्सुकता गोंदिया पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्याला आग्रहाची लागली असल्याचे पाहायला मिळत आहे.