तांबवे ता फलटण येथील,कौटुंबिक वादातून फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच आरोपीला मात्र अटकपूर्व जामीन मंजूर ॲड विकास पाटील शिरगावकर..!



प्रतिनिधी सातारा.

तांबवे ता फलटण येथील,कौटुंबिक वादातून फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच आरोपीला मात्र अटकपूर्व जामीन मंजूर ॲड विकास पाटील शिरगावकर.

तांबवे ता: सातारा सातारा लोणंद मार्गावर असलेली कुटुंबाची एकत्रित मालमत्ता अर्जुन विनायक शिंदे व किसन विनायक शिंदे या दोन भावांनी वाहतूक व्यवसायातून मिळविल्यानंतर परस्पर संमतीने वाटप करून स्वतंत्र वहिवाट सुरू केली होती मिळकतीतील एक गाळा कापड व्यवसायासाठी देण्यात आला व त्यासाठी लेखी संमतीपत्रही तयार करण्यात आले अर्जुन यांच्या मालकीच्या जमिनीवर ₹१५ लाखांचे कर्ज घेण्यात आले होते दरम्यान अर्जुन यांच्या नावावरील स्कॉर्पिओ वाहन किसन शिंदे यांनी बनावट सह्या करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करण्यात आला सदर प्रकरणाची कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) तपासणी करून एमएच ०५ डी डब्ल्यु -२९९९ हे वाहन ब्लॅकलिस्ट केले त्यामुळे ते आता विकतात येत नाही व आता गुन्हावदैखल होणार या भिती पोटी किसन यांनी अर्जुन यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ४२० (फसवणूक) ४६८ (बनावट दस्तऐवज तयार करणे) व ४७१ (बनावट दस्तऐवजाचा वापर करणे) अंतर्गत लोणंद पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली मात्र सुरुवातीला लोणंद पोलिसांनी हा वाद दिवाणी स्वरूपाचा वाटपाचा दावा असल्याचे कारण देऊन गुन्हा नोंदविण्यत आला नाही त्यानंतर किसन विनायक शिंदे हे फलटण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साो यांचे समोर तक्रार दिली सबब मे.न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला अर्जदार यांचा ठाम आरोप आहे की ही तक्रार खोटी असून, ती केवळ कौटुंबिक वैमनस्यातून आणि कल्याण येथे तक्रार दाखल करू नये व तो दबाव टाकण्यासाठी दाखल करण्यात आली आहे अर्जदार व त्यांचे वडील अर्जुन विनायक शिंदे यांनी आमच्या कुटुंबात संपत्तीचे वाटप झाल्या नंतर आम्ही आपापली वहिवाट स्वतंत्रपणे सुरू केली होती. मात्र, कौटुंबिक कलहातून माझ्यावर बनावट आरोप ठेवले गेले आहेत.माझ्या नावावरील वाहनाच्या बाबतीत प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांनी सह्यांची पडताळणी करून सदरचे वाहन ब्लॅकलिस्ट केले आहे व तो राग मनात धरून कायद्याच्या गैर वापर करून चुकीचे गुन्हे लावले गेले आहेत. मला न्यायालयातून न्याय मिळेल, असा दृढ विश्वास आहे असे त व्यक्त केले होते मात्र फलटण जिल्हा व सत्र न्यायालयाने ॲड विकास बा पाटील शिरंगांवकर, सरकारी वकील व मुळ फि यांचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून संबंधित अर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याने ॲड विकास पाटील शिरगावकर यांच्या युक्तिवादाची सर्वत्र चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले.