प्रतिनिधी सातारा
मानवनिर्मित आग दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियमावली जारी ॲड विकास पाटील शिरगांवकरांच्या पाठपुराव्याला अखेर यश.
मांढरदेवी दुर्घटना (२००४) पासून मंत्रालय, कमला मिल, रुग्णालये, धारावी, भिवंडी यांसारख्या ठिकाणी लागलेल्या आगीत असंख्य निरपराधांचा बळी गेला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या बहुतेक घटना एलपीजी गळती, शॉर्ट सर्किट आणि निष्काळजीपणामुळे झाल्या आहेत आपत्ती व्यवस्थापन कायदा, आग प्रतिबंधक कायदा जरी अस्तित्वात असला तरी प्रशासनामार्फत त्याची अंमलबजावणी अद्याप प्रभावीपणे झालेली दिसून येत नाही अनेक आदेश हे केवळ कागदोपत्री राहिले असून प्रत्यक्ष अंमलबजावणी व काटेकोर कारवाई दिसून आली नाही यानंतर आता मात्र भिवंडी आग दुर्घटना प्रकरणानंतर ॲड शिरगावकरांनी हा मुद्दा उपस्थित करून न्यायालयाच्या व प्रशासनाच्या व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सर्व संबंधित विभागांकडून आग प्रतिबंधासाठी कोणत्या उपाययोजना असाव्यात” याबाबत तातडीने मत मागविले आहे. याचा उद्देश म्हणजे जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, औद्योगिक क्षेत्रे, व्यापारी संकुले, रुग्णालये आणि घनदाट वस्त्यांमध्ये आग लागण्याचे प्रकार टाळणे हा आहे मानव निर्मित आग दुर्घटना टाळणे बाबत ॲड. विकास पाटील शिरगांवकर यांनी प्रशासनाचे सातत्याने लक्ष वेधले आहे भिवंडी येथील एका गोदामात शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग ही स्पष्टपणे अपघाताची घटना असताना त्या संदर्भात एक महिला गोदाम चालीकेवर सदोष मनुष्यवधाचा चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला हा मुद्दा भिवंडी न्यायालयात ॲड. शिरगांवकरांनी उपस्थित केला, मात्र तो कसा बरोबर आहे व तो का दाखल केला याचे उत्तर पोलीस तपास यंत्रणा व सरकारी वकील यांनी न्यायालया समोर देता आले नाही सदरचा गुन्हा हा जामीन पात्र गुन्हा असताना, पोलिसांनी गोदामातील एका कर्मचाऱ्यावरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली तो कर्मचारी अनेक दिवस कारागृहात तो होता ती अटक व कोठडी ही बेकायदेशीर आहे हा मुद्दा न्यायालयासमोर ॲड शिरगांवकरांनी उपस्थित केला होता व सदर कायदेशीर मुद्द्यां बाबत ॲड. विकास बा पाटील शिरगांवकर व ॲड लश्वराज विकास पाटील- शिरगांवकर यांनी भिंवंडी जिल्हा न्यायालयासमोर संप्रमाण कायदेशीर ठोस बाजू मांडली व आरोपीस जामीन मिळवून दिलाॲड विकास बा पाटील शिरगांवकर यांनी मानवनिर्मित आगीचे अपघात होऊ नयेत, जीवित व वित्तहानी टळावी आणि सार्वजनिक सुरक्षा व जनहित जपले जावे या उद्देशाने, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करण्यासाठी संबंधित आमदारांना निवेदन करण्यात आले होते आणि तो प्रश्न सभागृहात मांडला गेला होता त्यानंतर ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरला व न्यायालयासमोर या प्रश्नाची बाजू मांडली व न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाने याची गंभीर दखल घेऊन सर्व इमारती व आस्थापनांमध्ये अग्निशामक साधने बसवणे व त्यांची नियमित तपासणी बंधनकारक करणे,विद्युत यंत्रणा, एलपीजी कनेक्शन व ज्वलनशील पदार्थांच्या साठवणुकीसाठी सुरक्षा मानके पाळणे अग्निशमन सराव अग्नीरोधक यंत्रणा जनजागृती मोहिमा आणि आपत्कालीन योजना प्रत्येक संस्थेत अनिवार्य करणे कायदा पाळावा अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून झाले असल्याने ॲड विकास पाटील शिरगावकर यांच्या लढ्याला यश आले असल्याने त्यांचे आभार व सर्वत्र त्यांच्या लढ्याचे कौतुक केले जात आहे.

