गोंदिया येथील पोलीसांना नवीन कलमांन विषयी माहिती करून देणारे ॲड विकास पाटील शिरगावकरांचे व्याख्यान राज्यभर गाजले..!



प्रतिनिधी गोंदिया

गोंदिया येथील पोलीसांना नवीन कलमांन विषयी माहिती करून देणारे ॲड विकास पाटील शिरगावकरांचे व्याख्यान राज्यभर गाजले.

गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तपासातील चुका या वर झालेल्या व्याख्यानाला १०० हून अधिक पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळेस ॲड विकास पाटील शिरगावकर म्हणाले तपासादरम्यान झालेल्या चुका आणि त्यातून पोलिसांना येणारे अपयश या विषया वरती ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी सांगितले तपासा दरम्यान गुन्ह्याचे घटना स्थळ, मयताचा पंचनामा, कपडे जप्ती आरोपीचे निवेदन व हत्यार जप्ती पंचनामा,तपास टिपण, तसेच मुद्देमालल गोळा करून तो पाठविताना पोलिसांना होणारा विलंब, रक्त घटक डीएनए या बाबतची पुरावा व दोषसिद्दी चे प्रमाण का वाढत नाही असे ॲड विकास पाटील शिरगावकर म्हणाले व सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निवाडे हे काय सांगत आहेत याचे अवलोकन तपास यंत्रणेने केलं पाहीजे या वरती ॲड विकास बा.पाटील-शिरगांवकर म्हणाले तपास हा खरे गुन्हेगार दोषी ठरावे या साठी आवश्यक असणारा पुरावा सादर करणे गरजेचे असते नवीन कायदा त्यातील तरतुदी या संदरभातील कायदेशीर मुद्दे,अत्यंत सोप्या भाषेत समजावून घेतले पाहिजेत उल्हास नगर येथील भाजपाचे कार्यकर्ते इंदर भटीजा यांचे खून प्रकरणी पप्पू कलानी यास खूनाचे संगनमत करणारा मुख्य सूत्रधार व संगनमता मधे रचलेला खुनाचा कट हा शाबीत झाला म्हणून खून करणारे तीन शार्प शूटर्स यांना आजन्म कारावासाची शिक्षा का झाली, ॲड विकास पाटील-शिरगांवकर यांनी चालविलेला तो खटला,१२ फितूर साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास व त्यामधून सरकार पक्षाची केस शाबूत करणे व तो पुरवा कसा ग्राह्य धरता येतो याची माहीतही देण्यात आली तसेच मोना स्कुल गॅंग रेप खटला,रेल्वे मध्ये बाथरूम मध्ये लहान मुलींवर केलेला बलात्कार व तिला लोणंद येथे रेल्वे मधून फेकून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे याचे तपासामध्ये,जबाबदारी झटकण्या साठी पोलीसांनी लष्करातील निरपराध जवानास पकडले व त्यांना मे. न्यायालयाने निर्दोष का केले, याचीही माहिती ॲड.विकास पाटील शिरगांवकर यांनी,तपास यंत्रणा व पोलीसांना दिली, तसेच गुन्हा दाखल आहे आरोपीने तो गुन्हा केलेला नसताना, त्याला आरोपी करणे सुध्दा बेकायदेशीर ठरते, ताबा ,अटक व आरोपीस न्यायालया समोर हजर करताना २४ तास केव्हापासून चालू होतात या बद्द्लची योग्य व कायदेशीर बाजू हे मुद्दे समोर आणले. कार्यक्रमावेळी आयोजकांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया अशा होत्या की, “आम्ही अशा प्रकारचं व्याख्यान ऐकलं नव्हतं,हे खरोखरच एक स्विच ऑन आणि बूस्टर ठरलं आहे, जे खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळावी यासाठी योग्य तपास करण्याची प्रेरणा देतं.” व भविष्यामध्ये देत राहील असे सांगून गोंदिया पोलिसांच्या वतीने ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा सन्मान करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.