सतीश पवार यांचा जामीन रद्द करण्यासाठी पिढीते कडून न्यायालयात अर्ज आरोपीने न्यायालयाच्या नियमावलीची पायमल्ली केली ॲड विकास पाटील शिरगावकर.
प्रतिनिधी पांचगणी
पाचगणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश पवार यांचे राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणात आता साताऱ्याचे कायदेतज्ञ वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांची पिढीतेने आपल्या केस मध्ये नियुक्ती केल्यानंतर न्यायालयातील युक्तिवादात काय ठरणार ? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे, पिढीते कडून सांगण्यात आले आहे की आरोपीला जामीन देण्याकरिता माझा पूर्ण विरोध होता परंतु दबावापोटी आणि भीतीपोटी माझ्याकडून काही वकिलांनी जबरदस्तीने नोटरीच्या साह्याने माझा जबाब लिहून घेतला व आरोपीला जामीन देण्यास माझी काहीही हरकत नाही असे मला न्यायालयासमोर सांगण्यास मजबूर केले परंतु एका साताऱ्यातील नामांकित वृत्तवाहिनीने माझी मुलाखत घेतल्यानंतर मला थोडा धीर आला आणि माझी केस पुन्हा एकदा नव्याने तपासा करिता उभी राहिली परंतु तपास करत असताना या गुन्हातील आरोपीला पोलिसांच्या साहाय्याने मदतच झाली असल्याचे मला दिसत आहे, मी आरोपी संदर्भात अर्ज करून ही माझ्या अर्जाला कुठल्याही प्रकारचे उत्तर अथवा माझा जबाब अथवा माझं म्हणणं पोलिसांमार्फत ऐकून घेतले जात नाही यासंदर्भात मी वाई न्यायालयांमध्ये मेहरबान न्यायालयासमोर सर्व काही माझी व्यथा मांडली आहे, व मेहरबान न्यायालयाने मला सांगितले आहे की आपण आपल्या वकिलांच्या सहाय्याने मेहरबान न्यायालयामध्ये जे काही आपलं म्हणणं आहे त्या संदर्भात अर्ज दाखल करू शकता व त्या अनुषंगाने आज रोजी आम्ही ॲड विकास पाटील शिरगावकर यांची नियुक्ती या केस मध्ये केली आहे, ॲड विकास पाटील शिरगावकर हे मला न्याय देतील अशी आशा मला आहे, असे पिढीते कडून सांगण्यात आले आहे, तर पिढीतेच्या वकिलांनी सांगितले आहे की मला गुन्हेगारांचा चांगला अभ्यास आहे, मी पंधरा वर्षे सरकार पक्षाकडून पिढीतांना न्याय देण्याचे काम केले आहे व त्या अनुषंगाने मी अनेक गुन्ह्यांमध्ये सरकार पक्षाकडून मेहरबान न्यायालयामध्ये सरकारची बाजू मांडून गुन्हेगारांना कठोर शासन करण्याचे काम केले आहे, स्वारगेट अत्याचार प्रकरणांमध्ये सरकारतर्फे मी लढावे असे काही विचारवंतांची मागणी होती परंतु काही कारणास्तव ती केस मला मिळू शकली नाही याची खंत माझ्या मनामध्ये कायम राहील या प्रकरणांमध्ये देखील आरोपीला न्यायालयाने जामीन देत असताना अनेक टम्स आणि कंडिशन वरती बेल मंजूर केला होता परंतु आरोपीने सदर नियमावलीची व टम्स आणि कंडीशन ची पायमल्ली केली असल्याचे दिसून आले आहे सदर आमच्या पक्ष काराला अनेकांच्या माध्यमातून फोन करून केस मागे घे असा दबाव देखील आणल्याचे या केस मध्ये दिसून आले आहे, पोलिसांच्या माध्यमातून फिर्यादीचे कुठल्याही प्रकारचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही अथवा तपास फिर्यादीच्या सांगण्यावरून केला जात नाही ही भविष्यासाठी काळाची घंटा आहे, व याचे मला दुःख देखील आहे, आमच्याकडे असणारे पुरावे हेच सांगतात की मेहरबान न्यायालयाने आरोपी सतीश पवारला मंजूर केलेला तात्पुरता जामीन हा रद्द होऊ शकतो व यासाठी मी पुरेपूर आमच्या पक्षकाराच्या बाजूने प्रयत्न करणार आहे, ही लढाई गुन्हेगारा विरुद्ध सरकार असून एका पिढीत महिलेच्या आत्म सन्मानाची लढाई आहे व त्यासाठी आम्ही पिढीतेच्या बाजूने पूर्ण ताकतीने लढू आणि जिंकू असे पिढीतेचे वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी सांगितले आहे येत्या तारखेमध्ये न्यायालया मध्ये काय युक्तीवाद होणार याकडे जिल्हावासी यांचे लक्ष लागले आहे.

