अमोल विश्वनाथ पाटील याच्यावरती पिंपरी चिंचवड येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी न्यायालयाची दिशा भूल करत न्यायालयातच कागदपत्रांमध्ये फेरफार केले ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा पोलिसांवरती गंभीर आरोप, सीसीटीव्ही फुटेज चेक करत न्यायालयीन चौकशीची ही मागणी करणार ॲड शिरगावकर.



प्रतिनिधी पुणे

अमोल विश्वनाथ पाटील याच्यावरती पिंपरी चिंचवड येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी न्यायालयाची दिशा भूल करत न्यायालयातच कागदपत्रांमध्ये फेरफार केले ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा पोलिसांवरती गंभीर आरोप, सीसीटीव्ही फुटेज चेक करत न्यायालयीन चौकशीची ही मागणी करणार ॲड शिरगावकर.

पिंपरी चिंचवड येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल होतात सांगली येथून ताब्यात घेतलेला आरोपी अमोल विश्वनाथ पाटील याला पिंपरी चिंचवड न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्याचे काम पाहत असणाऱ्या ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी न्यायालयामध्ये पोलिसांवरती गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे शिरगावकर म्हणाले दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पिंपरी पुणे पिंपरी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीयांच्या न्यायालयात सुरू असलेल्या फौजदारी प्रकरण क्रमांक १३४७/२०२५ मध्ये आरोपी अमोल विक्रमनाथ पाटील यांचे तर्फे दि.७/१०/२०२५ रोजी ॲड विकास बा पाटील शिरगांवकर यांनी युक्तिवाद केला व त मध्ये दि १७/४/२०२५ रोजीचे आरोपीचे अटक पंचनम्सा मध्ये ४.४० ही पंचनामा वेळ नमूद असून त्यास ४.३० वा न्यायालयात व हजर केले आहे सबब त्यास न्यायालयात हजर करणेपुर्वी अटक केली नव्हती तसेच आरोपीचा फोटो लावला नव्हता सदरचे २१ मुद्दे मे न्यायालयाने लिहून घेतले व दि ७/१०/२०२५ रोजी सदरकाम ३१/१०/२०२५ रोजी सरकार पक्षाचे युक्तीवादावर नेमले होतेसदरकामी दि.३१/१०/२०२५ रोजी ॲड विकास पाटील शिरगांवकर यांनी न्यायालयीन कागदपत्रे तपासली असता आरोपीचे अटक पंचनाम्यावर दि.७/१०/२०२५ रोजी आरोपीचा फोटो नसताना, तो नंतर चिटकविला हे समोर आल्यानंतर येथील गंभीर बाब न्यायालयासमोर उपस्थित केली व लेंखी अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये नमूद केले आहे की, तपास अधिकाऱ्यांनी, ती चुक भरून काढणासांटीऽ संबंधित न्यायालयाचे कर्मचारी यांचे कडून कागद पत्र घेऊन त्यांना अंधारात ठेवून आरोपीचा फोटो दि ७/१०/२०२५ नंतर न्यायालयात येऊन लावला आहे, आरोपी कडे असलेला दोषारोप पत्रा मध्ये आरोपीचे अटक पंचनाम्यावर फोटो नाही. सदरचा प्रकार हा गंभीर असून संबंधित तपास यंत्रणेची चौकशी करावी याबाबत आवश्यक ते आदेश देण्याची मागणी केली आहे या प्रकरणावर मा न्यायालय जी १०/११/२०२५ रोजी सुनावणी घेऊन निर्णय देणार आहे बचाव पक्षातर्फे ॲड विकास बा पाटील शिरगांवकर व ॲड शिवराज विकास पाटील शिरगांवकर काम पाहत असून ॲड विकास पाटील शिरगावकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले न्यायालयामध्ये अशाप्रकारे पोलिसांनी केलेले कृत्य हे कायद्याला धरून नसून कायद्याला नष्ट करणारे कृत्य आहे अशा पोलिसांवरती मेहरबान न्यायालयाने कोठारात कठोर कारवाई करत संबंधित पोलिसांच्या चौकशीच्या आदेश जारी केले पाहिजेत तो फोटो वाटप पंचनामे मध्ये नसताना तो अचानक त्या ठिकाणी आला कसा? याची चौकशी झाली पाहिजे न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले पाहिजेत अशी विनंती आम्ही न्यायालयाला करणार आहोत असे आरोपीचे वकील ॲड विकास बा पाटील शिरगांवकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.