३२,१०४९८ चा धनादेश न वटता परत आल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता ॲड विकास पाटील शिरगावकर



प्रतिनिधी पुणे

३२,१०४९८ चा धनादेश न वटता परत आल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता ॲड विकास पाटील शिरगावकर

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोा,पुणे यांच्या समोर रचना डेव्हलपर्स तर्फे सौ. वंदना धनंजय जाधव यांनी टोटल डिस्ट्रीब्युटर्स पुणे तर्फे प्रमोद भारत सरवळे यांच्याविरुद्ध एन.आय.ॲक्ट कलम.138 प्रमाणे फौजदारी खटला क्रमांक.418491/2014 दाखल केला. सदर कामी फिर्यादी पक्षातर्फे सौ.वंदना धनंजय जाधव तसेच बँकेचे साक्षीदार तपासण्यात आले. सदर कामी बचाव पक्षातर्फे ॲड.विकास पाटील शिरगावकर यांनी सर्व साक्षीदारांचा उलट तपास घेतला त्यामध्ये मुख्य करून फिर्यादी सौ.वंदना धनंजय जाधव यांनी उलट तपासामध्ये दिलेली उत्तरे ही सदरचा खटला हा कायद्याचा कसा दुरुपयोग करणारा आहे हा मुद्दा समोर आणला. फिर्यादी यांनी त्यांचे उलट तपासामध्ये असे मान्य केले होते की सदरचा धनादेश हा सुरक्षेपोटी देण्यात आलेला होता. तसेच तो धनादेश हा परत करावा. जो काही पैशाचा देण्याघेण्याचा व्यवहार आहे तो आपण चर्चा करून सोडवूया. तसेच फिर्यादी यांच्या नावे खरेदी झालेली जमीन विक्री केल्यानंतर त्याचे सर्व पैसे त्यांना मिळालेले आहेत. हेही मान्य केले. फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये कोणताही लेखी करारनामा सादर केला नाही. फिर्यादी यांनी असेही मान्य केले की त्यांचे पती हे पोलीस खात्यात नोकरी करतात. सदर धनादेशातील रकमे संदर्भात फिर्यादी यांनी सन 2016 साली डेक्कन पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणी तपासी अधिकारी यांनी आपणास फसवणुकीबाबतची कागदपत्रे घेऊन यावीत अशी लेखी समज दिली. मात्र आपण पुन्हा पोलीस ठाण्यामध्ये लेखि कागदपत्रे घेऊन गेला नाही. सबब डेक्कन पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी यांनी आरोपीचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा केल्याचा पुरावा नसले बाबतचा अहवाल मे. न्यायालयात सादर केला. फिर्यादी यांनी असेही मान्य केले की, सदर अहवालावर मे. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याबाबत बोलावलेले होते. मात्र आपण न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे न्यायालयात आज अखेर हजर राहिला नाही. फिर्यादी यांनी उलट तपासामध्ये हेही मान्य केले की या कामी हजर केलेले कागद हे सत्यप्रतीत आहेत. मात्र त्याच्या मूळ प्रति न्यायालयात आपण हजर करू शकत नाही. 2017 साली डेक्कन पोलीस ठाणे येथे नवीन पोलीस निरीक्षक बदलून आले, जे फिर्यादी यांचे पती एसीपी. श्री.धनंजय जाधव यांचे मित्र आहेत. व त्यांनी आरोपीला खुले करण्याबाबतचा दिलेला अहवाल न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना आरोपीचे विरुद्ध एका साक्षीदाराचे टिपण घेऊन आरोपीचे विरुद्ध सबळ पुरावा मिळाला म्हणून दोषारोप पत्र पाठविले सदर कामी फिर्यादी पक्षातर्फे सदर धनादेश संदर्भात बँकेचे कागदपत्र न्यायालयासमोर आणले सदर साक्षीदारांनी मे.न्यायालयासमोर हे मान्य केले की, सदर कागदपत्रावर अधिकृत इसमाची सही नाही तसेच त्याच्यावरती तारीख नमूद केलेली नाही. तुम्ही न्यायालयात ज्या दिवशी आला त्या दिवशी साक्षीमध्ये हे कबूल केले आदल्या दिवशी सदरचे कागदपत्रे तयार केलेली आहेत. वरील सर्व प्रकार विचारात घेऊन तसेच सुरक्षिततेपोटी दिलेल्या धनादेशाची रक्कम आरोपी देणे लागतो, याबाबतचा कोणताही पुरावा फिर्यादी पक्ष न्यायालयात शाबित करू शकले नाहीत. सदर कामी ॲड.विकास पाटील शिरगावकर यांनी बचाव पक्षातर्फे सादर केलेला पुरावा व सादर केलेला युक्तिवाद विचारात घेऊन आरोपी श्री.प्रमोद भारत सरवळे यास निर्दोष मुक्त केले. सदर निकालाचे अवलोकन करून फिर्यादी यांचे वरती कायद्याचा गैरवापर करून आरोपीस शिक्षा व्हावी या उद्देशाने केस दाखल केली. याबाबत फिर्यादी यांचे वरती दिवाणी व फौजदारी कारवाई केले बाबत न्याय हक्क राखून ठेवला आहे. सदर निकालाची चर्चा पुणे जिल्ह्या मध्ये सर्वत्र होत आहे.