कोल्हापूर कळंबा गॅस स्फोट प्रकरण दोषींवरती न्यायालयीन कठोर कारवाई होण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. विकास पाटील-शिरगांवकर यांची नेमणूक करा पिढीतांच्या नातेवाईकांचा आक्रोश.!



प्रतिनिधी कोल्हापूर

कोल्हापूर कळंबा गॅस स्फोट प्रकरण दोषींवरती न्यायालयीन कठोर कारवाई होण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. विकास पाटील-शिरगांवकर यांची नेमणूक करा पिढीतांच्या नातेवाईकांचा आक्रोश.

कळंबा येथे झालेल्या भीषण गॅस स्फोटात निर्दोष नागरिकांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेबद्दल संबंधित गॅस कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल व्हावेत अशी पिढीतांनी केली असल्याचे निदर्शनास आले आहे, या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड.विकास बाबुराव पाटील शिरगांवकर (सातारा) यांची नेमणूक व्हावी, अशी आग दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या पीडितांच्या नातेवाईकांची मागणी असल्याचे निदर्शनास आले आहे भिवंडी येथील गोडाऊन आग प्रकरणी आग का लागतात व आपत्ती व्यवसथापन कायद्याचे पालन प्रशासनाने का केले पाहीजे हा मुद्दा न्यायालयासमोर ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी वेळोवेळी मांडला होता या अशा जीवघेण्या दुर्घटना टाळण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून कठोर कार्यवाही आवश्यक असल्याने ॲड. विकास पाटील-शिरगांवकर यांना गुन्हेगारी खटल्यातील कामाचा फार मोठा अनुभव आहे त्यांनी याआधी वाजेवाडी गावाला संपूर्ण एलपीजी सुरक्षित गाव बनवून शेकडो शेतकरी कुटुंबांना आग दुर्घटनेपासून सुरक्षित केले आहे व देशाची इंधन संपत्ती वाचवित आहेत या प्रकल्पाची Limca Book of Records मध्ये नोंद झाली असून राष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळाली आहे या जोरावरती कळंबा दुर्घटनेतील पिढीतांच्या नातेवाईकांची ठांम भूमिका ही आहे की कळंबा दुर्घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात समाजहितासाठी ॲड. विकास पाटील-शिरगांवकर यांच्या कायदेशीर ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग शासनाने करून घ्यावा असे अनेक राजकीय पक्षांसह काही सामाजिक संघटनांनी देखील शासनाला आवाहन केले आहे की, या प्रकरणी तात्काळ योग्य ती कार्यवाही करून ॲड. पाटील-शिरगांवकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून कळंबा स्पोर्ट दुर्घटने प्रकरणी नेमणूक करण्यात यावी.