जालना प्रतिनिधी
(ॲड) (डॉ) अन्वर हुसेन (लेखक) अनमोल कांबळे (ॲड) निकुंज पाटील ओबीसी (नेते) इकबाल अन्सारी (ॲड) रसूल शेतारी (ॲड) धीरज भट या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांन सह इतर कार्यकर्त्यांकडून अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या भेटी जरांगे पाटील काय घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष.?
दिनांक २९/१०/२०२४ रोजी जालना अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन (लेखक) अनमोल कांबळे (ॲड) निकुंज पाटील ओबीसी (नेते) इकबाल अन्सारी(ॲड) रसूल शेतारी (ॲड) धीरज भट या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडून अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या भेटी घेण्यात आल्या आहेत यावेळेस सुप्रीम कोर्टाचे वकील (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन म्हणाले आमचा लढा हा जगप्रसिद्ध वकील विचारवंत महमूद प्राचा यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानिक दृष्ट्या सुरू आहेत, देशात निवडणुका या वॉलेट पेपर वरती झाल्या पाहिजेत ही आमची प्रामुख्याने मागणी आहे व त्या संदर्भात आम्ही लढा देत आहोत, महाराष्ट्रा मध्ये मराठा समाजाला आरक्षण हे संविधानिक दृष्ट्या कशा पद्धतीत देण्यात येऊ शकते या संदर्भात आमची आखणी सुरू आहे व ती आम्ही जरांगे पाटीलांसमोर लवकरच जगप्रसिद्ध वकील महमूद प्राचा यांच्या सोबत मांडणार आहोत,तर सामाजिक कार्यकर्ते (लेखक) अनमोल कांबळे म्हणाले जरांगे पाटील हे गोरगरिबांचा आधार आहेत नाराजांचा आवाज आहेत व ते त्यांनी आपल्या भूमिकेच्या माध्यमातून वारंवार राज्याला नव्हे तर देशाला दाखवून दिलेल आहे, महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे, हे आज त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आम्हाला समजते, राज्यामध्ये जरांगे पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे व त्याचा फायदा हा संविधानिक दृष्ट्या देशाला दिशा देण्याकरिता होणार आहे व या चळवळीमध्ये आमचा देखील सहभाग आहे, याचा आम्हाला गर्व आहे व आम्ही नेहमी जगप्रसिद्ध वकील महमूद प्राचा व (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन व इतर सहकाऱ्यांनी या देशात उभारलेल्या लढ्यासोबत ठामपणे उभे आहोत असे (लेखक) अनमोल कांबळे यांनी सांगितले असून (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन यांच्या सह सर्व विचारवंतांच्या भेटीनंतर जरांगे पाटील अंतरवाली सराटी मधून काय घोषणा करणार? याकडेसंपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

