प्रतिनिधी अनमोल कांबळे
लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे हेच आमचे प्रथम कर्तव्य कोल्हापूर सर्किट बेंच मुळे लवकरात लवकर लोकांचे प्रश्न सुटण्याकरिता पर्याय मिळाला ॲड धैर्यशील सुतार.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असणाऱ्या कोल्हापूर सर्किट बेंच मुळे जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळेल व त्याचे समक्ष साक्षीदार होण्याकरिता दिल्ली व मुंबईचे मॅटर पाहत असताना कोल्हापूर सातारा रत्नागिरी सोलापूर या ठिकाणचे सुद्धा केसेस योग्यरित्या न्यायालयाच्या समोर मांडून लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आता आमची सर्व टीम घेऊन आम्ही कोल्हापूरमध्ये देखील आलो आहोत, या पाच जिल्ह्यातील लोकांवरती होणारा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी व तो कायदेशीर रित्या न्यायालयासमोर मांडून लोकांना न्याय मिळवून देण्याच प्रथम कर्तव्य आमच असून काही पिडीतांना दोन तीन गंभीर प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून दिलासा मिळवून दिल्याचेही ॲड धैर्यशील सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

