महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयाचे संचालक बी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या आई योजनेच्या प्रचार रथाला उपसंचालक क्षमा पवार यांच्या कडून हिरवाई कंदील..,
पुणे प्रतिनिधी
अनमोल कांबळे
महिला औद्योगीकरण सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पर्यटन संचालनालयाने आई योजनेची अंमलबजावणी केल्यामुळे महिला औद्योगिक सक्षमीकरणाला पाठबळ मिळणार असून याचा लाभ तळागळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता पर्यटन संचालनालयाचे संचालक बी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आई योजनेचा पालखी रथ तयार केला असून आषाढी वारीच्या मुहूर्तावरती वारकऱ्यां मध्ये जाऊन पर्यटन विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता हा रथ तयार केला असल्याने लोकांना याच्या माध्यमातून पर्यटन संचालनालयाच्या आई योजनेची माहिती मिळणार असून गरजू व उद्योजक महिलांना याचा लाभ मिळणार असल्याचे पुणे विभागातील पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक क्षमा पवार त्यांनी सांगितले व त्यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी रताला हिरवा कंदील दाखवून लोकांच्या सेवेमध्ये रथ सुपूर्त केला असल्याचे पाहायला मिळाले., रथ उद्घाटन प्रसंगी पर्यटन संचालनालयाचे प्रकल्प अधिकारी मयुर देविदास नांद्रे म्हणाले आमच्या विभागाचे लक्ष एकच आहे की जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा उपभोग घेता आला पाहिजे योजने विषयाची माहिती ही पर्यटन संचालनालयाच्या वेबसाईट वरती देखील उपलब्ध असून या योजनेचा लाभ प्रत्येक महिला उद्योग सक्षमीकरण नारीने घेतला पाहिजे पर्यटन संचालनालय विभाग त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहिले,तर रथ उद्घाटन प्रसंगी संचालनालयाचे उपलेखापाल आनंद जोगदंड त्याचबरोबर इतर क्षेत्रातील मान्यवर पत्रकार अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.,

