प्रतिनिधी पांचगणी
भारत बंदला ऑल इंडिया पॅंथर सेनेचा जाहीर पाठिंबा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांचे स्पष्टीकरण.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात भारत बंदचे आंदोलन या देशांमध्ये उभे राहत आहे या भारत बंदला सर्व संघटनांनी पाठिंबा देत आपले मत व्यक्त केले असल्याने या निर्णयाच्या विरोधात दिनांक 21 रोजी भारत बंदची हाक दिली असल्याकारणाने सातारा येथील सर्व पक्ष संघटनांना या निर्णयाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून आपले मत व्यक्त करणार आहेत भारत बचाव आरक्षण बचाव आंदोलनाला आपला पाठिंबा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी जाहीर केला आहे त्याच्या पाठिंबाच्या बळावरती आज रोजी सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड पॅंथर यांनी देखील आपला पाठिंबा सर्व कार्यकर्त्यांसोबत या आंदोलनाला देऊन सहकार्याची भूमिका घेतली आहे आरक्षण वाचलं तर तुम्ही आम्ही वाचू आरक्षण संपलं तर तुम्ही आम्ही संपू जोपर्यंत या देशात जातीयवाद आहे तोपर्यंत आरक्षण हे टिकले पाहिजे असे मत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी व्यक्त केले आहे तर आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही आणि जर का तसा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचं ध्येय आमच्या मध्ये आहे हे मत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी व्यक्त केले आहे, मला गर्व आहे मी आरक्षण वादी असल्याचा आणि तुम्हालाही गर्व असल्यास दिनांक 21/8/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता सातारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापशी सर्व कार्यकर्त्यांनी जमावे व या धोरणाच्या या सरकारचा निषेध करावा या निषेध आंदोलनाला आंमचा जाहीर पाठिंबा आहे आणि तुम्हीही तुमचा जाहीर पाठिंबा द्या असे मत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

