प्रतिनिधी अनमोल कांबळे
पाचगणी नगरपालिकेने अनधिकृत बेकायदेशीर बासली का हॉटेल वरती केलेली कारवाई पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, पाचगणी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी आपले कर्तव्य बजावत पाचगणी येथील बेकादेशीर हॉटेल असणाऱ्या बासलीका हॉटेल वरती धडाकेबाज कारवाई करत मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या नियमांचे अंमलबजावणी केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते मात्र कारवाई झाल्यानंतर विस्कटलेलं रूप पुन्हा एकदा सजवण्याकरिता हॉटेल ने आपले झालेले नुकसान एकत्र करत बासली का हॉटेलच्या मॅनेजरने शेजारीच असणाऱ्या फायनल प्लॉट नंबर 376/390/ मध्ये हॉटेलचे डबर दगड व इतर सामान हे ॲड अन्वर हुसेन यांच्या असणाऱ्या मिळकतीमध्ये टाकून वृक्ष लागवड केलेल्या झाडांची हत्या करण्यात आली आहे, त्याचप्रकारे अन्वर हुसेन यांच्या गाडीची देखील तोडफोड बासली का हॉटेलचे असणारे मॅनेजर यांच्याकडून करण्यात आल्याचे अन्वर हुसेन यांनी सांगितले आहे, अन्वर हुसेन पुढे म्हणाले मी यासंदर्भात पाचगणी नगरपालिकेमध्ये तक्रार दाखल केली आहे व मला विश्वास आहे मुख्याधिकारी माझ्या तक्रारीची दखल घेऊन रोडवरती फेकलेले माझ्या जागेतले डबर हे बासली का हॉटेल मॅनेजमेंट ला उचलायला लावतील व हॉटेलच्या माध्यमातून झालेल्या वृक्ष लागवडीच्या नुकसानीची भरपाई देतील आणि आणखी वृक्ष रोपण करतील ही आशा आम्हाला आहे माझ्या गाडीची व वृक्षांची तोडफोड करणाऱ्या वरती कारवाई न झाल्यास येत्या 15/ ऑगस्ट रोजी मला आंदोलन करावे लागेल असे अंन्वर हुसेन यांनी सांगितले.

