मा: पै: अनिकेत भाऊ घुले यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने यशोधन अनाथ आश्रम मध्ये अन्नदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न,
महाबळेश्वर प्रतिनिधी
डॉ.मा.पै तानाजी भाऊ जाधव” टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष” यांच्या मार्गदर्शाना खाली मा.श्री.पै.”अनिकेत भाऊ घुले” ”युवासेना प्रमुख पुणे जिल्हा यांच्या वाढदिवसानिमित्त यशोधन अनाथ आश्रम वेळे येथे अन्नदान वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळेस टायगर ग्रुप सातारा जिल्ह्याच्या वतीने सर्व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता टायगर ग्रुप चे कार्य हे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव लोकगीत आहे व हे कार्य इथून पुढे अशाच प्रकारे सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वर तालुक्यामध्ये राहील अशी ग्वाही व शपथ देखील या वेळी महाबळेश्वर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते., यावेळेस संतोष कोरके संस्थाचालक यांचे देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले मतिमंद मुलांना सांभाळणे हे फार कौतुकास्पद आहे, यांचे कार्य पाहून युवा वर्गाने मार्गदर्शन घ्यावे संस्थाचालकांचे आभार मानत पुढील वाटचालीस सर्व टायगर ग्रुप च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या..,

