वाई उपविभागीय प्रांत अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही आदेशाला केराची टोपली महाबळेश्वर तहसीलदारांच्या हलगर्जीपणामुळे निष्पापाचा बळी तहसीलदारांवरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा-अनमोल कांबळे.



महाबळेश्वर प्रतिनिधी

महाबळेश्वर पाचगणी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामांचा वर्चस्व असल्याने व या बेकायदेशीर बांधकामांना खत पाणी घालण्याचे काम महसूल विभागातील अधिकारी करत असल्याने त्या खतपाण्यातील प्रमुख असणारे साधन म्हणजेच वाळू तस्करी, याच वाळू तस्करी ला वर्धहस्त असणाऱ्या व अधिकाऱ्यांचा अधिकार वापरून काळी माया गोळा करणाऱ्याला प्रोत्साहन देत असणाऱ्या महसूल विभागातील महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख महाबळेश्वरच्या न्यायदंडाधिकारी तहसीलदार सुषमा पाटील यांचाच हात असल्याचे चित्र समोर येत आहे?, व विविध ठिकाणी वरिष्ठ कार्यालयामध्ये या विषयी चर्चा देखील चालू आहेत, व याच चर्चेमुळे वरिष्ठ अधिकारी हे महाबळेश्वर तहसीलदार सुषमा पाटील यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे चित्र देखील दिसून येत आहे,. एक डंपर महाबळेश्वरच्या दिशेने वाईला जात असताना एका निष्पापाला व माजी शासकीय कर्मचाऱ्याला चिरडतो परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई ही या तालुक्यामध्ये बाहेरून येत असणाऱ्या वाळू माफियांवरती होत असताना दिसत नाही, पाचगणी महाबळेश्वर मध्ये खुलेआम वाळू डबल च्या गाड्या फिरत आहेत. कुठल्याही प्रकारची शासनाला रॉयल्टी न भरता या गाड्या फिरत आहेत, केवळ एक पावती करायची आणि चार चार ट्रिपा टाकायच्या व या ट्रीपला खतपाणी घालण्याचे काम पाचगणी महाबळेश्वर तालुक्यातील महसूल च्या प्रमुख न्याय दंडाधिकारी तहसीलदारांच्या आदेशाच्या माध्यमातून होत असल्याचे चित्र समोर येत आहे, व याविषयी उपविभागीय प्रांताधिकारी वाई यांना विचारपूस केले असता आम्ही सर्व अधिकार महाबळेश्वर तहसीलदारांना देऊन टाकलेले आहेत, इतकंच काय तर सर्वे नंबर 9/ भिलार मध्ये माजी मुंबई पोलीस उपायुक्त यांनी शासनाच्या नियमांना डावलून तहसीलदारांच्या अहवालानुसार प्रचंड मोठ्या प्रमाणात उभारलेला राजवाडा देखील पाडण्याचे आदेश आम्ही तहसीलदारांना देऊन टाकलेले आहेत, परंतु तहसीलदार कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने आम्ही तहसीलदारांविरुद्ध लवकरच प्रस्ताव हा वरिष्ठ कार्यालयात पाठवणार असल्याचे उपविभागीय प्रांताधिकारी वाई यांनी सांगितले आहे., निष्पापाला चिडणे हा एक्सीडेंट नसून ही वाळू माफी यांच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याकरिता केलेली हत्या आहे, आणि या हत्तेची जबाबदारी ही महाबळेश्वर तहसीलदारांनी स्वीकारली पाहिजे, कारण त्यांच्याच हलगर्जी पानांमुळेच ही हत्या झालेली आहे, अजून किती निष्पांचे जीव जाणार आहेत? हे देखील महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील त्यांनी स्पष्ट करावे अनमोल कांबळे.