विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावरती राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या नेतृत्वात आम्ही केलेल्या प्रयत्नांना उद्या यश मिळेल आणि आबा विजयाचे मानकरी ठरतील श्री विशाल गोळे..!



विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावरती राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या नेतृत्वात आम्ही केलेल्या प्रयत्नांना उद्या यश मिळेल आणि आबा विजयाचे मानकरी ठरतील श्री विशाल गोळे.

प्रतिनिधी अनमोल कांबळे

विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावल्याने आता विजयाची प्रतीक्षा उरली असल्याने महाबळेश्वर तालुक्यामधून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात मकरंद आबा पाटील यांना मताधिक्य दिले असल्याचे वारंवार कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे, परंतु खऱ्या विजयाचे मानकरी कोण ठरणार? हे आता काही तासांवरच येऊन ठेपले असता, भोसे गावचे सुपुत्र व मावळ प्रतिष्ठान सातारा जिल्हा अध्यक्ष तसेच राजेंद्र शेठ राजपुरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या विशाल गोळे यांनी सांगितले राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर तालुक्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदानाच्या च्या दिवशी घड्याळ या चिन्ह समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने मकरंद आबा पाटील यांना कार्यकर्त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातून भोसे गावातून 100% मतदान देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे, व आम्हाला विश्वास आहे, उद्याचा निकाल हा कार्यकर्त्यांना बळ देणारा असून सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मतदानाचा आधार बनेल मकरंद आबा पाटील हे उद्या प्रचंड मताधिक्याने विजय होतील आणि जो विकास आबांच्या माध्यमातून राजेंद्र शेठ राजपुरे यांनी आमच्या तालुक्यामध्ये केला त्या विकासाला चालना देत शेतकऱ्यांना विविध योजना बेरोजगारांच्या हाताला रोजगाराच्या माध्यमातून चालना देण्याचे काम या तालुक्यांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाची प्रतिक्रिया मावळा प्रतिष्ठान सातारा जिल्हाध्यक्ष श्री विशाल गोळे यांनी बोलताना दिली आहे.