ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव या प्रमुख मागणी करिता दि. 23/1/2024 रोजी सकाळी ठिक 11:30 मिनिटांच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी निदर्शने आंदोलने होणारच जिल्हाध्यक्ष विशाल भोसले
सातारा प्रतिनिधी
रिपब्लिकन सेना सातारा जिल्हा यांच्यावतीने आगामी निवडणुका ईव्हीएम मशीन वर न होता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या या प्रमुख मागणी करिता देशभर आंदोलने करण्याच्या सूचना सरसेनानी आनंदराज आंबेडकर राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून तसेच प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आंदोलन सातारा जिल्ह्यात यशस्वी करण्याकरिता रिपब्लिकन सेना सातारा जिल्हा यांच्यावतीने ईव्हीएम विरोधात दि.23/1/2024 मंगळवार 11.30 वाजत जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी होणार असलेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळवले आहे. ईव्हीएम मशीन इलेक्ट्रॉनिक साधन आसून हे सॅटॅलाइट द्वारा हॅक करता येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रसार माध्यमातून घोटाळे गडबड झाल्याचे समोर आल्यानंतर ही निवडणूक निवडणूक आयोगा ने मशीन द्वारे घ्यावी व है निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करते का असा आमचा दावा असल्याने या निवडणूक प्रणालीवर लोकांचा विश्वास संपला आहे, यासाठी ईव्हीएम मशीने निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी व्ही एम मशीन विरुद्ध निदर्शने आंदोलन होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे,

