सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता (ॲड) विकास पाटील शिरगावकर यांचे नाव आग्रा स्थानी लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटणार
सातारा प्रतीनिधी
सातारा पंचवार्षिक लोकसभा निवडणूक जाहीर होताच सातारा जिल्ह्यात चे राजकीय वातावरण हे तापले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यातच आता कायदेतज्ञ (ॲड) विकास पाटील शिरगावकर यांच्या नावाची चर्चा देखील सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असल्याचे चित्र सर्वत्र जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे, विकास पाटील शिरगावकर यांनी ही सातारा लोकसभा निवडणूक ही अपक्ष अथवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी असा आग्रह जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व पक्षकारांकडून त्यांच्याकडे धरला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, त्यातच आता (ॲड) विकास पाटील शिरगावकर म्हणाले सातारा लोकसभा पंचवार्षिक निवडणूक ही देशाच्या हितकारक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये विजयी होणारा उमेदवार केवळ त्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधित्व करत नाही तर संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे, आणि यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्त्यांचे व पक्षकारांचे मला फोन करून व प्रत्यक्षात भेटून मी ही सातारा लोकसभा निवडणूक अपक्ष अथवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी असा आग्रह माझ्या कार्यकर्त्यांकडून व पक्षकारांकडून धरला जात आहे, सध्याचे राजकारण पाहता राजकारणाचा चिखल झालेला आहे, अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण या राज्यात सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ता हा नेत्याचा राहिलेला नाही अथवा नेता हा कार्यकर्त्याचा राहिलेला नाही या परिस्थितीमध्ये शेतकरी मजूर कष्टकरी हा फरपटलेला आहे आणि याला आता प्रतीक्षा आहे ती त्याला न्याय देणाऱ्या व्यक्तीची आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर का माझ्यावरती विश्वास टाकला तर मी त्या विश्वासाला कुठेही दगा देणार नाही व कटिबंध राहून जनतेला न्याय देण्याकरिता पात्र राहीन मी केवळ भाषणांमध्ये बोलणारा व्यक्ती नसून प्रत्यक्षात संबंधित कष्टकरी मजूर शेतकऱ्याला कायद्याच्या माध्यमातून न्याय देणारा वकील आहे आणि म्हणून मला माहित आहे न्याय हा कसा द्यायचा असतो आणि न्याय हा कसा घ्यायचा असतो माझ्यावरती जर का महाविकास आघाडीने या जिल्ह्याची जबाबदारी टाकली तर मी योग्यरित्या पार पाडेन आणि सातारा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर इथे असणाऱ्या कष्टकरी शेतकरी मजूर बहुजन समाजाला योग्य न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कार्यकर्त्यांनी व पक्षकारांनी माझा प्रचार हा चालू केलेला आहे, व मी लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहे, तुम्ही सोबत घेतलं तर सोबत येऊ नाही तर एकटे चालू परंतु विजय हा नक्की मिळवून हे ध्येय घेऊनच येणार्या निवडणूकी संदर्भात कार्यकर्त्यांशी व पक्षकारांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे सातारा जिल्ह्यातील कायदे तज्ञ (ॲड) विकास पाटील शिरगावकर यांनी सांगितले,

