प्रतिनिधी अनमोल कांबळे
मा: नरेंद्र मोदी विचारमंच भारत च्या नावाखाली मुंबईतील बिहारी वासुदेव शर्मा नावाच्या व्यक्तीकडून वाई पाचगणी महाबळेश्वर परिसरामध्ये लोकांची फसवणूक वाढली वरिष्ठांची नावे वापरत असणाऱ्या बिहारी शर्मा वरती पोलीस प्रशासन कारवाई कधी करणार?
माझे थेट नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी संबंध आहेत व मी महाराष्ट्र पोलीस महासंचालक रक्ष्मी शुक्ला यांच्या टच मध्ये आहे असे सांगत व त्यांची भेट घेतल्याचा फोटो परिसरातील लोकांना दाखवत तुमचे कितीही मोठे गुन्हे पोलीस स्टेशन व इतर ठिकाणी गंभीर स्वरूपाचे दाखल असल्यास माझ्याकडे या माझा मुलगा हायकोर्टचा वकील आहे आपण सर्व मॅनेज करून देऊ असे सांगत वरिष्ठांच्या नावाचा गैरवापर करत मूळचा बिहारचा असणारा मुंबईमध्ये राहणारा व पोटापाण्यासाठी वाई पाचगणी महाबळेश्वर परिसरामध्ये येणारा वासुदेव शर्मा नावाच्या व्यक्तीने वाई पाचगणी महाबळेश्वर या परिसरामध्ये नरेंद्र मोदी विचार मंच भारत या संस्थेचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, असे सांगत लोकांची फसवणूक सुरू केली असल्याचे दिसून आले आहे, मात्र ही संस्था रजिस्टर आहे का? नाही हे अद्यापही कळाले नसल्याचे दिसून आले आहे, याच वासुदेव शर्मा नावाच्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी वाई मध्ये 376/ चा एक गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण सर्व काही मॅनेज करू शकतो असे सांगत स्वतःच्या मुलाकडे ती केस सोपवली होती मात्र याच्या मुलाला काहीही जमलं नसल्याने संबंधित निष्पापाला जेलची हवा खायला लागली होती त्यानंतर संबंधित आरोपीच्या कुटुंबांनी दुसरा वकील देत संबंधित आरोपीची न्यायालयाकडून जामिनावरती सुटका करून घेतली आहे मात्र या वासुदेव शर्माने संबंधित पिढीतांकडून 80 हजार रुपये मुलगा वकील आहे असे सांगत उगवले होते व मुंबईसारख्या ठिकाणी पळून गेला होता त्यानंतर पुन्हा एकदा वाई महाबळेश्वर खंडाळा परिसरामध्ये लोकांची मी कामे करून देईन नरेंद्र मोदी विचार मंचाचा मी अध्यक्ष आहे, असे सांगत हा व्यक्ती वाई महाबळेश्वर खंडाळा परिसरामध्ये लोकांची फसवणूक करत असल्याने आता स्वतः पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालून हा व्यक्ती खरोखर नरेंद्र मोदी विचार मंचाचा अध्यक्ष आहे का? याची संस्था रजिस्टर आहे का ? व हा कोणाच्या अंडर काम करतो याचा सखोल तपास करणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे नरेंद्र मोदी व प्रशासनाच्या नावावरती स्वतःची पोळी भाजणाऱ्या बिहारी शर्मा वरती सातारा पोलीस प्रशासन कारवाई करणार का ? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला आहे.

