पाचगणी प्रतिनिधी
पाचगणी नगरपालिका निवडणूक 2025 जाहीर होताच विविध प्रभागांमधून आपल्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज इच्छुक उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर पाचगणी शहरामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे मात्र या रणधुमाळी मध्ये विजयाचा गुलाल हा कार्यकर्त्यांच्या उत्साहाने व विश्वासाने वैभव कराडकर यांनाच लागणार हे आता निश्चित झालं असल्याचे पाहायला मिळत आहे, पाचगणीतील प्रभाग क्रमांक एक मधील मतदारांशी थेट संवाद करत वैभव कराडकर यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून मतदारांमधून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे, यासंदर्भात मतदारांशी संवाद साधल्यानंतर मतदारांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की गेल्या वेळी ज्या लोकप्रतिनिधींना आम्ही आमच्या प्रभागामधून निवडून दिले त्यांनी मात्र आमच्याकडे मागे वळून कधीही पाहिले नाही मात्र वैभव कराडकर यांच्या प्रचाराने व त्यांच्या समाजकार्याने व त्यांचा कायमस्वरूपी संवाद आमच्याशी असल्याने त्यांचा विजय या प्रभागातून निश्चित रूपाने होणार असल्याचे मतदारांकडून सांगण्यात येत असल्याने कराडकर यांचा विजय निश्चित झाला आहे या संदर्भात वैभव कराडकर आपले मत मांडताना म्हणाले गेल्या चार वर्षापासून संपूर्ण कारभार हा प्रशासनाच्या हातामध्ये असल्याने प्रभाग क्रमांक एकची अक्षरशः दुरर्दशा झाली आहे प्रभाग क्रमांक एक हा मी जाणीवपूर्वक या लोकांची सेवा व पाचगणीचे सौंदर्य वाढवण्याकरिता निवडणूक लढवण्याकरिता निवडलेला आहे, पाचगणी शहरांमध्ये प्रवेश करताच प्रभाग क्रमांक एक ची हद्द सुरू होती मात्र हद्द सुरू होताच खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हा प्रश्न येणाऱ्या पर्यटकाला व पाचगणी करांना पडतो त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये युवकांच्या हाताला रोजगार व काम देण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे सांगत वैभव कराडकर त्यांच्या प्रचारास मार्गस्थ झाले..,

