तोतया सुभाष कारंडे यांच्यावर महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सुभाष कारंडे चा आणि महाबळेश्वर तालुक्याचा काहीही संबंध नाही शेवटी तो मूळ गावातून हाकलून दिलेला उपरा वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष उत्तम भालेराव संतापले..!



प्रतिनिधी अनमोल कांबळे

तोतया सुभाष कारंडे यांच्यावर महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सुभाष कारंडे चा आणि महाबळेश्वर तालुक्याचा काहीही संबंध नाही शेवटी तो मूळ गावातून हाकलून दिलेला उपरा वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष उत्तम भालेराव संतापले.

मौजे कोट्रोशी हद्दीतील प्रोजेक्ट तारांगण विज्ञानकेंद्र उभारत असताना कायद्याचे उल्लंघन झाले असल्याच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाईची मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव यांनी राष्ट्रीय हरितलवाजा कडे केली होती परंतु भूमाफिया असणारा सुभाष कारंडे याच्या जेसीबी व पोकलॅंडचे काम सदर प्रकल्पामध्ये सुरू असल्याने राजरोसपणे रात्रीच्या अंधारात सुरुंग लावून उत्खनन सुरू असल्याने आता आपल्यावर देखील प्रशासनामार्फत कारवाई होणार की काय? या भीतीने सुभाष कारंडे यांनी उत्तम भालेराव यांच्याविरुद्ध दोन दिवसापूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपली प्रतिक्रिया मांडत असताना ब्लॅकमेलिंग प्रकार थांबवा असे मत मांडले होते परंतु त्या मताला प्रतिउत्तर देत असताना वंचित बहुजन आघाडीचे महाबळेश्वर तालुक्याचे नेते उत्तम भालेराव यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सुभाष कारंडे यांच्या वरती महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे प्रथमतः गुन्हा दाखल करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे उत्तम भालेराव म्हणाले सुभाष कारंडे हा भूमाफी आहे सह्याद्रीच्या कुशीत सुरुंग लावून सह्याद्रीचे लचके तोडणाऱ्या सुभाष कारंडे याने कायदेशीर न्यान आम्हाला देऊ नये सुभाष कारंडे हा काय आहे हे संपूर्ण 105 गावाला माहित आहे, सुभाष कारंडे कधी इकडे तर कधी तिकडे असतो आता त्याला आमदार गटाने हाकल्यामुळे तो सध्या शरदचंद्रजीत पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये नावापुरता कार्यरत आहे पक्षाच्या नावावरती स्वतःच्या पोटाची खळगी भरणारा हा सुभाष कारंडे आहे, कधी कधी आमदार गटाच्या कार्यक्रमाला देखील आपली हजेरी लावतो तर कधी कधी शिंदे साहेब गावाला आल्यास त्यांचे उंबरटे देखील झिजवतो सगळ्यात मोठा ब्लॅक मेलर हा सुभाष कारंडे आहे याने पक्षाच्या नावावरती अनेक शासकीय कामे हडपली आहेत पक्षाचे नाव वापरून पक्षाचा नावाचा गैरवापर केला आहे, याची अनेक बेकायदेशीर उत्खनने या तापोळा भागामध्ये सुरू आहेत परंतु महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे या संदर्भात देखील आम्ही लवकरच आवाज उठवणार आहे एखादा अधिकारी बेकायदेशीर उत्खनावरती कारवाई करायला गेल्यास सुभाष कारंडे त्या ठिकाणी जातो आणि सांगतो मी शिंदे साहेबांचा माणूस आहे व हे काम शिंदे साहेबांचे सुरू आहे फोन लावू का असे वारंवार सांगत असतो असे देखील चर्चा आमच्या कानावरती आहे, परंतु शिंदे साहेबांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या व स्वतःच्या तेटली गावातून हाकलून दिलेल्या तापोळा भागात बाहेरून आलेल्या स्थायिक झालेल्या या भुरट्या भूमिपुत्रा चा आता एकही बेकायदेशीर कारनामा मी माझ्या भागात चालू देणार नाही असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे महाबळेश्वर तालुक्याचे नेते उत्तम भालेराव यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले प्रशासन सुभाष कारंडे यांच्या बेकायदेशीर जेसीबी पोकलॅंड मशनरींन वरती कारवाई कधी करणार का ?