जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाचगणीतील हॉटेलांमध्ये रात्रीच्या बैठका कशासाठी ? जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज.?



प्रतिनिधी पांचगणी

जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाचगणीतील हॉटेलांमध्ये रात्रीच्या बैठका कशासाठी? जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज.?

दिनांक ९/७/२०२५ रोजी सातारा जिल्हा कार्यालयातील बांधकाम परवानगी मिळणाऱ्या टेबलचा तिडके नावाचा कर्मचारी हा रात्रीच्या वेळेस ९:५९: मिनिटाने पाचगणी येथील पारसी पॉईंट या ठिकाणी एका आलिशान गाडीतून उतरल्याने व हातामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील फायलींचा गट्टा असल्याने आज दिवसभर पाचगणी शहरांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला असल्याचे दिसून आले आहे, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन मानले जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये बांधकाम परवानगी मिळवण्याकरिता शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता एक राखीव टेबल आहे, व त्या टेबलाचा तिडके नावाचा क्लार्क पूर्वी महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयामध्ये कार्यरत होता मात्र आठ नऊ वर्षानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपली बदली होताच आपली सेटिंग वापरत पुन्हा एकदा महाबळेश्वर टेबलाचा चार्ज आपल्या हातामध्ये घेण्यात तिडके नावाचा कर्मचारी हा यशस्वी झाला असल्याने नक्की तिडके नावाच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरती हात तरी कोणाचा आहे? असा असणारा प्रश्न सर्वसामान्यांन सह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाच पडला असल्याचे दिसून आले आहे, म्हणजे ज्या तिडकेंची महाबळेश्वर तालुक्यातून बदली झाली त्या तिडकेना वाटलं होतं पाटण फलटण कराड या बाजूचा कारभार मिळेल असे दिसत असताना पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महाबळेश्वर तालुक्याचा चार्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आला आहे, मात्र काल दिनांक ९/७/२०२५ रोजी तिडके पारसी पॉईंट येथील एका बेकायदेशीर हॉटेलमध्ये जात असताना ज्या गाडीमधून उतरले ती कोट्यावधी रुपयांची आलिशान गाडी नक्की कुणाची? तिडकें यांच्या हातामध्ये असणाऱ्या फायली नक्की कुणाच्या सेवेसाठी आणल्या होत्या? हॉटेलच्या आत मध्ये नक्की ठरलं तरी काय? रायडिंग क्लबचा मालक असणाऱ्या मुंशी शेठच्या या फार्महाउस च्या बाहेर लागलेल्या सफारी कार मध्ये नक्की बसल तरी कोण होतं? हा असणारा प्रश्न पाचगणी करांना पडला असून जिल्हाधिकारी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून पाचगणी महाबळेश्वर मध्ये बांधकाम परवानगीच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या बेकायदेशीर परवानग्यां थांबवण्याकरिता कर्मचाऱ्यांना लगाम घालणार का? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.