तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांच्या कारवाईला दुधाने ब्रदर्स यांच्याकडून केराची टोपली कोण तहसीलदार म्हणत सर्कल तलाठी आमच्या खिशात म्हणत वार पुन्हा सह्याद्रीच्या कुशीत उत्खननाचा मात्र महापुर



तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांच्या कारवाईला दुधाने ब्रदर्स यांच्याकडून केराची टोपली कोण तहसीलदार म्हणत सर्कल तलाठी आमच्या खिशात म्हणत वार पुन्हा सह्याद्रीच्या कुशीत उत्खननाचा मात्र महापुर

प्रतिनिधी
अनमोल कांबळे

गेल्या आठवड्याभरापासून महाबळेश्वर तालुक्यामध्ये बाहेरून आलेल्या धनदांडग्यांच्या अनाधिकृत बांधकामांवरती कारवाई करत महसूल यंत्रणा सतर्क झाली आहे असे चित्र उभे करण्यात आले होते परंतु आठवडाभरापूर्वी झालेली कारवाई आता थंडावली असून हम खडे तो सरकारसे बडे म्हणत पाचगणी येथील तळमळा दांडेघर हद्दीमध्ये दुधाने ब्रदर्स यांनी आपले जेसीबी पोकलँड ट्रॅक्टर घेऊन अनाधिकृत उत्खननाचा महापूर तळमळा या ठिकाणी आणल्याचे चित्र दिसत आहे चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना व तहसीलदारांची अनाधिकृत बांधकामांवरती मोहीम चालू असताना हे काम शेठ यांचे चालू आहे असे पत्रकारांना म्हणत कोण तहसीलदार तलाठी व सर्कल यांचे बोलणे शेठ शी झाले आहे असे म्हणत सह्याद्रीच्या कुशीतच वार करण्याचं काम दुधाने ब्रदर्स यांनी केलेले दिसून येत आहे परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई ही या दुधाने ब्रदर्स वरती शासन नियंत्रणेकडून करण्यात येत नसून यांच्या मागचा तो मुख्य मास्टरमाईंड राजकारणी शेठ कोण ? ज्याच्या छायाछत्री खालून उत्खननाचा व बेकायदेशीर बांधकामांचा महापूर चालू आहे व ज्याच्या वरती महसूल यंत्रणा कारवाई करण्याकरिता टाळाटाळ करत आहे, जर का महाबळेश्वरची महसूल यंत्रणा कारवाई करती तर मग ती दुजाभाव का करती? खंड्यावरती कारवाई परंतु इतरांवरती कारवाई का नाही ? असा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला दिसून येत आहे, तहसीलदार तळमळा या ठिकाणी झालेल्या उत्खनाचा पंचनामा स्वतः करणार का ? व चालू असलेले बेकायदेशीर जेसीबी पोकलँड ट्रॅक्टर सील करणार का? हे बघने आता गांभीर्याचे ठरणार आहे, इतरांवर ती कारवाई म्हणजे केवळ शेठलाच काम मिळावे हे धोरण तर नाही ना अशी सध्या तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे.,