शासन आपल्या दारी भूमिका घराघरात पोहोचवणाऱ्या महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील व मंडल अधिकारी पारवे यांची प्रतिमा मलिंन करणारा जानकर जोमात पारवेसह महसूल यंत्रणा कोमात,
प्रतिनिधी
अनमोल कांबळे
दोन दिवसांपूर्वी महसूल यंत्रणेवरती बेभान आरोप करत महाबळेश्वरच्या प्रशासकीय महसूल यंत्रणेने भ्रष्टाचाराचा कळस घाटला आहे वारंवार आपल्याकडे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून पैशाची मागणी होत आहे असे फोन वरती सांगत स्वतःच अनाधिकृत हॉटेल उभारणाऱ्या जांनकर यांचे पितळ आता उघड पडल आहे की काय? अशी चर्चा आता संपूर्ण तालुक्यासह परिसरात चालू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे जानकर यांनी प्रखरपणे आरोप करत काही काळातच लोकांच्या मनांमध्ये शासकीय आदराचा दबदबा निर्माण करणाऱ्या तहसीलदार तेजस्विनी पाटील व पाचगणीचे मंडळ अधिकारी (सर्कल) पारवे यांची प्रतिमा मलिंंन करण्याचे धोरण तर आखल होतं की काय? कारण विषयाचे दुसरे पान पाहिल्यानंतर मंडल अधिकारी पारवे यांच्या कामाचा पंचक्रोशी मध्ये वाढता दबदबा पाचगणी व पाचगणी परिसरामध्ये आहे म्हणून कायमच पारवे यांची भूमिका ही इथल्या प्रस्थापित धनदांडग्यांना खूपच असल्याचे दिसते म्हणूनच की काय जांनकर यांनी अनाधिकृत हॉटेल उभरत असताना आपण सांगू तेच तोरण आणि मीच ठरविन हेच धोरण ही भूमिका राबवत आपली लबाड युक्ती फोनवरून मांडली तर नाही ना ? अशी देखील चर्चा तालुक्यामध्ये आत्ता सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महसूल यंत्रणेवरती आरोप करत स्वतःच्या अनाधिकृत बेकायदेशीर हॉटेलचे उद्घाटन हे रविवारच्या सुट्टीच्या दिवशीच ठेवत महसूल यंत्रणेला चॅलेंज करणाऱ्या जांनकर यांच्या बांधकामा वरती पूर्वीच फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल असताना आत्ता पुन्हा एकदा पारवे यांची बदनामी करत जानकर यांनी आपण ठरवू तेच धोरण या राबवलेल्या युक्तीला महसूल यंत्रणा लगाम घालणार का? हे पाहणे गरजेचे ठरणार आहे,

