अचानकपणे लाखो रुपये खर्च करून पाचगणीतील सुशोभीकरण करण्यात आलेल्या तलाठी कार्यालयामध्ये अधिकारी नावाला हजर मात्र कामाच्या बाबतीत गैरहजर असल्याने प्रशासना मार्फत आता तरी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अनमोल कांबळे



अचानकपणे लाखो रुपये खर्च करून पाचगणीतील सुशोभीकरण करण्यात आलेल्या तलाठी कार्यालयामध्ये अधिकारी नावाला हजर मात्र कामाच्या बाबतीत गैरहजर असल्याने प्रशासना मार्फत आता तरी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अनमोल कांबळे

प्रतिनिधी
किरण अडसूळ

पाचगणी महाबळेश्वर पर्यटनासाठी प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असल्याने अधिकारी देखील चार्ज घेताच काही दिवसातच कामाच्या बाबतीत थंड होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, पाचगणीतील मंडळ अधिकारी हा कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपाचा दिला असल्याने लोकांच्या कामाची अडचण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर मात्र दुसरीकडे शासनाच्या माध्यमातून एकही रुपये खर्च न करता अचानक पणे पाचगणीतील तलाठी कार्यालयावरती कृपादृष्टी कुणाची तरी झाल्याने लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पाचगणीतील तलाठी कार्यालयामध्ये अधिकारी हजर मात्र कामाच्या बाबतीत गैरहजर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे पाचगणीतील तलाठी कार्यालय मध्ये नक्की चालय तरी काय एकीकडे बेकायदेशीर पॅराग्लायडिंग करिता तक्रारदाराचे म्हणणे ऐकून न घेता तक्रारदाराला आपले म्हणे मांडण्याकरिता वेळ न देता केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी खास माणूस आहे असे सांगत पक्षातील पदाधिकाऱ्यांपेक्षा मीच सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कर्ताधर्ता मीच असल्याचे सांगत तहसीलदारांसमोर भिलारे बसल्याने सर्कलांणी परस्पर तक्रारदाराला म्हणणे मांडण्याकरिता वेळ न देता अति तातडी अहवाल पाठवला जर का परस्पर अहवाल पाठवायचा होता तर मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचे म्हणणे घ्या असे पत्र का ? काढले भिलार चा स्वयंघोषित नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वापरून प्रशासन चालवतो का? याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, ऐश्वर्या हॉटेल पाचगणी च्या समोर रात्रीच्या अंधारामध्ये चालणारे जे सी बी उत्खनन कुणाच्या आशीर्वादाने चालतात याचे आत्मपरीक्षण तहसीलदारांनी करावे येत्या आठ दिवसात या गोष्टींवरती कारवाई न झाल्यास व प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन करावे लागेल असे अनमोल कांबळे यांनी सांगितले