प्रतिनिधी
अनमोल कांबळे
मौजे आंब्राळ येथील सर्वे नंबर 32 /2 मध्ये बेकायदेशीर रीत्या शासनाची कुठली ही परवानगी न घेता इको सेन्सिटिव्ह झोन च्या नियमांचे उल्लंघन करून चालू असलेले बेकायदेशीर खोदकामा वरती थेट तहसीलदारांनीच कारवाईचा बडगा उभारत जे सी बी मालकासह धनदांडग्यांला चांगलाच दणका देण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली असून या घटनेने पंचक्रोशीतील बेकायदेशीर कृत्य करणारे धनदांडगे चांगलेच भयभीत झाले असून या लँड माफिया यांच्यात सुधारणा होणार की पुन्हा एकदा आपल्या बेकायदेशीर कारवाया गिते तलाठ्यांना हाताशी धरून हे चालूच ठेवणार ? अशी देखील चर्चा लोकांमध्ये सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, इतकंच काही तर तहसीलदारांना आब्रळ दिसले मात्र आंब्रळ ला जात असताना खिंगर दिसले नाही का असा देखील प्रश्न लोकांच्या चर्चेमधून उपस्थित होत आहे. खिंगर गावांमध्ये रोड वरती उभे असणारे बिना नंबर प्लेटचे डंपर जे सी बी ट्रॅक्टर तहसीलदार यांना दिसले नाहीत का? कि त्यांच्यावरती मुद्दाम कारवाई गेली गेली नाही? असा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळात तहसीलदार कठोर निर्णय घेऊन कारवाया करणार का ? की पुन्हा एकदा तात्पुरती कारवाई करून बेकायदेशीर कामे करणाऱ्या गुन्हेगारांना मुभा देणार ? हे पहावे लागेल.

