तहसीलदार सुषमा पाटील यांचे तालुक्यात लक्ष नसल्याने तालुक्यात धनदांडग्यांचा हायदोस सौंदर्याची नासधूस महसूल अधिकाऱ्यांची मात्र हाताची घडी तोंडावरती बोट….



प्रतिनिधी
अनमोल कांबळे

तालुक्यातील वादळी अधिकारी असणाऱ्या महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांनी तालुक्याचा कारभार हातात घेतल्यापासूनच वादळी कारभार ठरल्याचे चित्र दिसत आहे परंतु आता आपल्याला तीन वर्षे पूर्ण झाल्याने व आपल आता तालुक्यातून पुनर्वसन होणार असल्याने तालुक्यातच तहसीलदारांनी कानाडोळा केला असल्याने व महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिला असल्याने तुम्ही तुमच्या मर्जीने कामे करा आमचा कार्यकाळ थोडाच राहिला आहे असे सांगत थेट संपूर्ण तालुक्यातच तहसीलदार सुषमा पाटील यांचं दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे तालुक्यातच कानाडोळा झाल्याने व संपूर्ण कारभार हा राष्ट्रवादीच्या बगलबच्चनच्या हातांमध्ये आल्याने खिंगर गोडवली भिलार सारख्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची नासदूर झाल्याचे चित्र दिसत आहे खिंगर सारख्या ठिकाणी तर बिना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टर डंपर जे सी बी खुले आम फिरत आहेत त्यातील काही बिना नंबर प्लेटचे पासिंग न झालेले पूर्वीचे ट्रॅक्टर जे सी बी हे पाचगणी चे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना हफ्ते देऊन खुलेआम नगरपालिकेच्या कामांमध्ये रुजू केलेले दिसत आहेत जर का मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांना लँड माफिया कडून हप्ता नाही जर का ते टक्केवारी खात नाहीत तर त्यांनी बिना नंबर प्लेटचे नो पासिंग असणारे डंपर जे सी बी शासकीय कामात रुजू करून घेतलेच कसे? सर्वसामान्यांना टू व्हीलर पासिंग केली नाही तर आरटीओ त्याला नोटीस काढतो त्याचेच पडसाद खुद्द तहसीलदार सुषमा पाटील यांनी महाबळेश्वर तहसीलदार अशी पाटी एका गाडीवरती लावली तर त्यांची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयातच आरटीओने पकडली होती. परंतु पाचगणी शहरात हे बिना नंबर प्लेट चे ट्रॅक्टर डंपर जेसीबी खुलेआम फिरत आहेत शासकीय कामात रुजू झालेले आहेत, केवळ आणि केवळ गिरीश दापकेकर यांना हफ्ते चालू असल्यामुळेच आणि म्हणून याची सुरुवात खेड्यातून झाली असून. सह्याद्रीच्या दऱ्याखोरांची नासधूस करत असताना तहसीलदारांनी हाताची घडी आणि तोंडावरती बोट ठेवल्यानेच या लॉंड माफिया यांची इतकी मजल वाढलेली दिसून येत आहे, तहसीलदार पुन्हा एकदा तालुक्यामध्ये लक्ष घालून झोपलेल्या यंत्रणेला जागे करणार का ? असा असणारा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये उद्भवलेला आहे,