महाबळेश्वर प्रतिनिधी*
*संदीप यादव*
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ नवनिर्वाचित जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, यांच्यावतीने करण्यात आला होता, त्याच अनुषंगाने आज दि 2/8/2022, रोज महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार सुषमा पाटील यांचा मागासवर्गीय संघटनांच्या वतीने व प्रेरणा जनकल्याण सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने आज अनमोल कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे, महाबळेश्वर तालुका हा अत्यंत संवेदनशील तालुका राहिलेला आहे, तालुक्यामध्ये सुषमा चौधरी पाटील यांनी जेव्हापासून तालुक्याचे पदभार तहसीलदार म्हणून स्वीकारला आहे, तेव्हापासून अनेक रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याचे काम झालेलं आहे कांदाटी खोरापासून वाई हद्दीपर्यंत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम झालेलं आहे, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम झालेलं आहे, शासनाने नुकसान भरपाई चे पंचनामे करण्या करिता आदेश काढताच पंचनामे पटकन पूर्ण करून घेण्याचे काम हे तहसीलदार सुषमा पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्याचं काम केलेलं आहे, तालुका वाचला पाहिजे तालुक्याचे सौंदर्य वाचलं पाहिजे म्हणून पाचगणीच्या तत्कालीन नगराध्यक्षांचे चिरंजीवांनी पर्यावरणाची हानी करून स्वतःच्या स्वतासाठी उत्खनन केल्याप्रकरणी त्यांना सात लाख रुपये दंड आकारण्याचे काम तहसीलदार सुषमा पाटील यांनी केलेल आहे, इतकंच काय तर शासनाला न जुमांणारा व शासनाच्या आदेशाला न्यायालयामध्ये चॅलेंज करणारा धनदांडगा दोराम दुभास याला देखील उत्खनन केल्याप्रकरणी 50 लाख रुपये दंड करण्याचे काम तहसीलदार सुषमा पाटील यांच्या माध्यमातून झालेल आहे, पुण्यातील उद्योगपती जोगळेकर असतील यांना देखील त्यांच्या जागेमध्ये येण्यापासून वीस वर्षांपासून रोखत असलेल्या पाचगणीतील प्रतिष्ठित पणाचा बुरखा ओढलेल्या माजी नगरसेविकेच्या गुन्हेगारीला लगाम लावून जोगळेकर यांना त्यांच्या जागेमध्ये मेहरबान न्यायालयाच्या आदेशाने स्वतः स्पॉट वरती जाऊन वाट देण्याचे काम तहसीलदार सुषमा पाटील यांनी केलं आहे, आणि म्हणून खरा सत्कार हा सन्मान हा तहसीलदार सुषमा पाटील यांचा झालेला नसून या तालुक्यातील न्याय देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा झालेला दिसून येत आहे, म्हणून आमच्या वतीने आज आम्ही तहसीलदारांचा सन्मान करून भविष्यात त्यांच्या कार्यात हातभार लावण्याची वेळ आल्यास आम्ही त्यांना शंभर टक्के मदत करू असे आश्वासन अशी ग्वाही अनमोल कांबळे यांनी दिली आहे,

