सुहास वाकडे सह रविराज जोशी यांना अडचणीत आणण्याचा आमदार मकरंद आबा पाटील यांच्या सह दांडेघर ग्रामस्थ कोतवाल ज्योती कांबळे व तलाठी सनस यांचा डाव फसला 2017 च्या सातबार्या वरती मारले 2024 चे शिक्के 2017 ची पुनरावृत्ती करून पाचगणी शहरातून मोर्चे काढून मते मिळवण्याचा आमदार मकरंद पाटील यांचा डाव फसला तलाठी कोतवाल यांच्या वरती तहसीलदार काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष.



प्रतिनिधी अनमोल कांबळे

मौजे दांडेघर येथील 2017 साली सुहास वाकडे यांनी विद्युत नियंत्रण महामंडळाकडे लाईट कनेक्शन साठी अर्ज केला होता मात्र त्या अर्जामध्ये तलाठी कार्यालयातून मिळालेल्या सातबार्या वरती घरपड असा उल्लेख करून चक्क सातबार्या वरती तलाठी यांची सही होती तरी देखील सुहास वाकडे यांनी सातबार्या वरती फेरफार करत घरपड नोंद केली आहे, असे सांगून ग्रामस्थ दांडेघर शंकर कळंबे राजू कळंबे अजित कळंबे व इतर यांनी राजकीय शक्तीचा गैरफायदा घेत आमदार मकरंद पाटील यांची ताकद वापरून व त्यांचे नाव वापरत प्रशासनावर दबाव निर्माण करत पाचगणी येथील विद्युत नियंत्रण महामंडळा कडे लाईट कनेक्शन घेण्यासाठी सुहास वाकडे यांनी खोटा सातबारा जोडला असे सांगून मोर्चा काढला होता व सुहास लक्ष्मण वाकडे यांच्या नावे मौजे दांडेघर येथील बुक क्रमांक पाच मधला त्यांच्या स्वतःच्या मालकी हक्काचा 2४७/ हेक्टरचा सातबारा खोटा आहे असे सांगून सुहास वाकडे यांच्यावरच सातबार्या वरती फेरफार केला घरपड लावली असे सांगून सुहास वाकडे यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु पुन्हा एकदा त्याच कटाची पुनरावृत्ती दिनांक 20/9/2024 रोजी झाल्यानंतर मागील घडलेला सर्व प्रकार हा पूर्णपणे खोटा असल्याचे चित्र लढा महाराष्ट्राच्या माध्यमातून आज रोजी जनतेसमोर येऊन ठेपले आहे, हे पुरावे पाहता सुहास वाकडे यांनी सांगितले की आमच्या वतीने आमची सर्व बाजू आमचे वकील मांडतील तर ॲड रविराज जोशी म्हणाले आमदार मकरंद आबा पाटील हे वाई विधानसभेचे आमदार आहेत परंतु त्यांना कारखाना कमी पडतो ग्रामपंचायत कमी पडते खासदारकी कमी पडते जिल्हा मध्यवर्ती बँक कमी पडते म्हणूनच की काय स्वतःच्या कुटुंबातील एका व्यक्तीला बेकायदेशीर रित्या पॅराग्लायडिंग परवानगी काढून दांडेघर देवस्थान जागेमध्ये दादागिरी करून गुंडांचा वापर करून व राजकीय दबाव तंत्र वापरून आपल्याच कुटुंबातील एका व्यक्तीला पॅराग्लायडिंग देखील मोठ्या प्रमाणात सुरू करून दिले आहे, व त्यातून कमी वेळात लाखो रुपयांची मिळणारी काळी माया ही गावगुंडांना हाताशी धरून स्थानिक भूमिपुत्रांवरती हल्ला करण्यासाठी आमदार मकरंद आबा पाटील वापरतात त्याच प्रकारे गावगुंड पोचण्यासाठी राजू कळंबे यांचे रोडवरील बेकायदेशीर हॉटेल देखील आमदार मकरंद आबा पाटील आपले गुंड पोचण्यासाठी वापरतात, व त्या संदर्भात त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या विरोधात पाचगणी पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली आहे, मला व सुहास लक्ष्मण वाकडे यांना त्रास देण्याचा डाव इलेक्शनच्या तोंडावरती आमदार मकरंद आबा पाटील यांनी आखला आहे, अधिकाऱ्यांना फोन करणे दांडेघर गावचे मूळ मालक असणारे सुहास लक्ष्मण वाकडे यांना अडचणीत आणण्यासाठी दांडेघर गावचे सनस तलाठी व कोतवाल ज्योती कांबळे यांना हाताशी धरून व ग्रामस्थांच्या सूचनेनुसार एका वकिलाच्या सांगण्यानुसार 2017 च्या सातबार्या वरती 2024 चे शिक्के मारून मतांसाठी शहरातून मोर्चे काढून आमच्या वरती पुन्हा एकदा नवीन गुन्हा दाखल करण्याचा हा डाव ग्रामस्थांन सह वाईचे आमदार मकरंद आबा पाटील यांचा फसलेला आहे, असे ॲड रविराज जोशी यांनी लढा महाराष्ट्र शी बोलताना सांगितले तहसीलदार कारवाई करणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष आता जर का आमदार मकरंद आबा पाटील यांचा या कशातच सहभाग नाही तर मग तलाठ्या वरती कारवाई होणार का ? की पुन्हा एकदा तलाठी कोतवाल ज्योती कांबळे यांना आमदारांचे व शासकीय अधिकाऱ्यांचे अभय मिळणार हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.