पर्यावरणाचे नियम धाब्यावरती बसवणाऱ्या मिलिटरीतील रिटायर कर्नल शशिकांत वाघमोडे यांना प्रशासनाचा दणका कासवंड गावच्या पूनम निलेश गोळे यांच्या तक्रारीला अखेर यश..,



पर्यावरणाचे नियम धाब्यावरती बसवणाऱ्या मिलिटरीतील रिटायर कर्नल शशिकांत वाघमोडे यांना प्रशासनाचा दणका कासवंड गावच्या पूनम निलेश गोळे यांच्या तक्रारीला अखेर यश..,

मौजे कासवंड येथील सर्वे नंबर 39/11 मध्ये मिलिटरी कॅप्टन अधिकारी शशिकांत वाघमोडे यांनी आपल्या मिलेट्री च्या अधिकारांचा गैरफायदा घेत मौजे कासवंड येथील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सर्वे नंबर 39/11 मध्ये बेकायदेशीर रित्या उत्खनन केले होते व त्या उत्खनाची तक्रार पुनम निलेश गोळे राहणार कासवंड यांनी तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील महाबळेश्वर यांच्याकडे केली होती पहिली तक्रार गाव कामगार तलाठी पवार यांच्याकडे दाखल होताच केवळ मॅनेज होऊन खोटा व किरकोळ एक पाणी पंचनामा हा तहसीलदार कार्यालयात पवार तलाठी यांनी सादर केला होता परंतु त्यानंतर पुनम गोळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना या संपूर्ण उत्खनाची चौकशी व पंचनामा करण्याची मागणी केल्यानंतर स्वतः तहसीलदार यांनी संबंधित ठिकाणी उपस्थित राहून बेकायदेशीर शशिकांत वाघमोडे यांनी केलेल्या उत्खनाचा पंचनामा केला होता व या प्रकरणात पुनम गोळे या सातत्याने या प्रकरणाविषयी माहिती घेत होत्या तक्रारी करत होत्या परंतु त्यांच्या तक्रारीला अखेर यश आले असल्याचे दिसून येत आहे तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी मिलिटरी रिटायर्ड कर्नल शशिकांत वाघमोडे यांना शासनाचा 4,46,400/-(चार लाख सेहचालीस हजार चारशे रुपये) असा ठणठणीत बेकायदेशीररित्या उत्खनन व खोदकाम केल्याप्रकरणी शासनाचा दंड आकारला असून संबंधित सर्वे नंबर 39/11 मध्ये इथून पुढे कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम केल्यास त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल असा आदेशच तहसीलदार यांनी दिला असल्याने शशिकांत वाघमोडे यांच्या सह कासवंड गावांमध्ये उत्खनन व बेकायदेशीर काम करणाऱ्या धनदांडक्यांचे धावे दनांनले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे, व इथून पुढे मिलिटरी च्या नावावरती कर्नल पदाच्या लेबल छातीला लावून शशिकांत वाघमोडे शासनाचे नियम पायदळी तुडवणार का? की गपचूप शासनाने आकारलेली दंडाची रक्कम भरणार हे बघणं गांभीर्याचे ठरणार आहे, तर पूनम गोळे म्हणाल्या शशिकांत वाघमोडे हे रिटायर्ड कर्नल आहेत असे ते सांगतात व गोरगरीब शेतकऱ्यांना फसवतात त्यांनी पाचगणी येथील सिडनी पॉईंट या ठिकाणी एक हॉटेल सुरू केले आहे व तेही बेकायदेशीर आहे याचाही पाठपुरावा करून लवकरच ते हॉटेल लवकरच सील करायला लावणार आहे
मात्र महाबळेश्वर तालुक्यातील एजंट आणि स्वयंघोषित पुढारी हे शेतघर परवानगी घेतो बिनशेती करतो असं सांगून मा तहसीलदार आणि मिळकत धारक दोघांचीही फसवणूक करत आहेत होत आहे इथून पुढे असे प्रकार घडू नये पर्यावरण वाचावे याकरिता प्रशासनाने ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे किंवा मग केंद्रशासनाला तरी प्रस्ताव पाठवा आणि सांगा आम्ही तुमचे नियम पाळत नाही पाळणार नाही खाल्या मिठाला जागावेच लागते ही एकदा भूमिका जाहीर करा असेही आवाहन केले आहे