पदाचा गैरवापर करून सह्याद्रीच्या दऱ्याखोरांचे लचके तोडणाऱ्या यूपीएससी कमिशन अधिकारी असणाऱ्या शशिकांत वाघमोडे याच्यावरती गुन्हा दाखल करा अनमोल कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांसह एचएलएमसी पर्यावरण एनवोर्मेन्ट कमिटीकडे तक्रारी द्वारे मागणी
सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या कुशीत सौंदर्याचे माहेरघर असणाऱ्या पाचगणी महाबळेश्वर परिसरामध्ये अनेक बाहेरून आलेल्या धनदांडग्या सह अधिकारी यांनी लोकांना त्रास देऊन जमवलेली आपली काळी माया घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोरांची लचके तोडत आलिशान बंगले बांधून शनिवार रविवार पार्ट्यांचा आस्वाद घेण्यासाठी पाचगणी महाबळेश्वर या ठिकाणी व्यवसाय सुरू करतात हे अलीकडे पाचगणी महाबळेश्वर परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे, त्यातच वेळोवेळी पोलिसांनी मारलेल्या धाडी छम छम सारखा आलिशान बंगल्यांमध्ये नटलेला बाजार हा इथल्या शैक्षणिक स्थळाला घातक बनत चालला आहे आणि यातच आता अधिकारी ही पाटी राहिलेले दिसून येत नाहीत मौजे कासवंड भिलार मेन रोड लगत यूपीएससी कमिशन अधिकारी असणाऱ्या शशिकांत वाघमोडे नावाच्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून अक्षरशः सह्याद्रीचे लचके तोडल्याचे काम केल्याचे दिसून येत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात तलाठी व सर्कल यांना हाताशी धरून इको सेन्सिटिव्ह झोन च्या नियमांचे उल्लंघन करत मै खडा तो सरकार से बडा हे धोरण हातामध्ये घेऊन उत्खनन करत बांधकाम सुरू केलेल्या चे दिसून येत आहे या संदर्भात अनमोल कांबळे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे तक्रार दाखल केलेली असून तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की यूपीएससी कमिशन अधिकारी असणाऱ्या शशिकांत वाघमोडे यांनी पदाचा गैरवापर करून पाचगणी येथील सिडनी पॉइंट या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आलिशान हॉटेल उभारलेल आहे, व ते त्या ठिकाणी बिनधास्तपणे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हॉटेल व्यवसाय करत आहेत त्याचप्रमाणे मौजे कासवंड येथील नुकतेच प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेले दिसून येत आहे व मी शासकीय अधिकारी आहे असे म्हणत तलाठी यांना सज्जत दम देऊन पंचनामा किरकोळ करायचा असे देखील सांगण्यात आलेले आहे याचा पुरावा आमच्याकडे आहे परंतु इतकच नाही तर तहसीलदार यांना भेटून माझ्या साईट वरती फिरकायचं देखील नाही असे देखील शशिकांत वाघमोडे यूपीएससी कमिशन अधिकारी यांनी तहसीलदार यांनाच दम भरलेला आहे याचा देखील पुरावा आमच्याकडे आहे तो शासनाला प्रशासनाला पाहिजे असल्यास आम्हाला पत्र द्यावे व आमच्याकडून तो पुरावा मागून घ्यावा असे देखील तक्रारीमध्ये म्हटले आहे इतकच नाही तर तात्काळ शशिकांत वाघमोडे यांची चौकशी करून त्यांच्या नावे बेहिशोबिन मालमत्ता आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी व इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याने इकोसिन्सिटी झोनच्या नियमांच्या नियमावलीनुसार तात्काळ शशिकांत वाघमोडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा असे देखील तक्रारीमध्ये म्हटले आहे, पुढे अनमोल कांबळे म्हणाले आमची तक्रार रास्त आहे लोकांच्या आणि पर्यावरणाच्या हितकारक आहे हित असणारा प्रस्थापित अधिकारी हा शशिकांत वाघमोडे यांच्या पदाला भित असल्याने कारवाई करायला भीत आहे आणि म्हणून लवकरात लवकर या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये बसून घंटानात आंदोलन करण्यात येईल असे अनमोल कांबळे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे,

