महाबळेश्वर तालुक्यात शाळा महाविद्यालय व शासकीय कार्यालयात अतिशय उत्साहात २६ नोव्हेंबर हा संविधान दिन पार पाडण्यात आला….



पाचगणी प्रतिनिधी….
दिनांक 26 -11-2022

भारतीय संविधानाचा (Indian Constitution Day) स्वीकार केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. भारतात दरवर्षी 2015 पासून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” (Indian Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस “भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. व 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
आज महाबळेश्वर तालुक्यात मा. तहसिलदार कार्यालय, मा.पंचायत समिती महाबळेश्वर, महात्मा फुले हायस्कूल पाचगणी या ठिकाणी संविधान प्रतिज्ञा चे वाचन करून मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच गिरीस्थान प्रशाला व ज्युनियर कॉलेज महाबळेश्वर यांनी संविधान प्रतिज्ञा वाचन व शहरातून फेरी देखील काढण्यात आली होती. अशा प्रकारे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला…