प्रतिनिधी अनमोल कांबळे
पाचगणी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती पाचगणीत गुंडाराज आहे का? आज सकाळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे संतोष कांबळे यांचे त्यांच्याच राहत्या घरातून अपहरण करण्याचा प्रयत्न संतोष कांबळे भयभीत.
पाचगणी नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग तापले असल्याने पाचगणी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती पाचगणी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरिता निवडणुकीच्या रिंगणात उभे असणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या पाचगणी शहराचे माजी नगरसेवक संतोष कांबळे यांचे राहत्या घरातून आज सकाळी अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे संतोष कांबळे हे सकाळी आपल्या राहत्या घरात नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात करत असताना अघोरीच्या वेश्यामध्ये पाच अघोरी स्वरूपाच्या व्यक्ती त्यांच्या घरासमोर आले व संतोष कांबळे यांना बाहेर बोलवा आम्ही आशीर्वाद द्यायला आलो आहे असे म्हणाले त्यानंतर संतोष कांबळे हे बाहेर आले व तुम्ही कोण आहात आणि कसला आशीर्वाद मला द्यायचा आहे मला तुमचा आशीर्वाद वगैरे काही नको असे म्हणतात क्षणी समोर उभ्या असणाऱ्या अघोरीने संतोष कांबळे याच्याकडे पाहून थुंकलं व हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र संतोष कांबळे यांनी त्यांना धक्का देत आपल्या बिल्डिंगच्या बाहेर काढत झटापटीत मारहाण सुरू केली व लोक जमा होतील या भीतीने अघोरी च्या वेशात संतोष कांबळे यांचे अपहरण करण्याकरिता आलेले आरोपी त्या ठिकाणाहून पळून जाण्यास यशस्वी ठरले असल्याने संतोष कांबळे हे भयभीत झाले असल्याचे संतोष कांबळे यांनी सांगितले आहे संतोष कांबळे हे पाचगणी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील दाखल करणार असल्याचे समजत आहे.

