पांचगणी येथील वाल्मीक बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी मधला भ्रष्टाचार बाहेर काढणार संतोष चव्हाण.

पांचगणी येथील वाल्मीक बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी मधला भ्रष्टाचार बाहेर काढणार संतोष चव्हाण.

January 7, 2025 | महाबळेश्वर

प्रतिनिधी पांचगणी

पांचगणी येथील वाल्मीक बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी मधला भ्रष्टाचार बाहेर काढणार संतोष चव्हाण.

पांचगणी येथील वाल्मीक नगरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी निर्माण केलेली वाल्मीक हाउसिंग सोसायटी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत संतोष चव्हाण यांनी भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहे, वाल्मीक हौसिंग सोसायटी ही कैलासवासी सोंमचंद चव्हाण यांनी सफाई कर्मचाऱ्यांना एकत्र करून स्थापन केली होती परंतु स्थापन केलेल्या सोसायटीच्या नियमावलीची दुर्दशा करण्याचे काम सध्या संस्था चालकांनी केल्याचे संतोष चव्हाण यांनी सांगितले आहे संस्थेच्या सेक्रेटरी यांनी तर स्वतःच पदाचा गैरवापर करत सोसायटीच्या नियमांना आपल्या पायथ्याडाने तुडवत सोसायटीमध्ये अनाधिकृत व बेकायदेशीर बांधकामाचा कळस गाटला आहे सर्वसामान्य मोल मजुरी करणाऱ्या मजूर सफाई कर्मचाऱ्यांना नगर रचना विभाग सातारा यांच्या माध्यमातून सोसायटीमध्ये घर बांधण्याकरिता 30 / 60 च्या प्लॉटला मंजुरी देण्यात आली होती त्या शासकीय नियमावलीची दुर्दशा करत सोसायटीच्या सेक्रेटरी यांनीच आपला आलिशान मेहेल बांधण्याकरिता सोसायटीच्या नियमावलीची दुर्दशा केल्याचे चित्र दिसून येत आहे, या संदर्भात संतोष चव्हाण यांनी आवाज उठवला असून सोसायटीमध्ये मजूर कष्टकरी यांच्या विकासासाठी येणाऱ्या निधी हा नक्कीच जातो कुठे व यामध्ये भ्रष्टाचार होतो की काय? अशी शंका व्यक्त केली आहे निधी मंजूर झाला की सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी सहित काही संचालकांकडे अचानक गाड्या व पांचगणी परिसरामध्ये आलिशान प्लॉट उपलब्ध होतात याची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याची संतोष चव्हाण यांनी सांगितले आहे, सेक्रेटरी यांनी तर आपल्या पदाचा गैरवापर करत वाल्मीक हाऊसिंग सोसायटीमध्ये जो राजमहल बांधण्याची धोरण आखले आहे शासकीय नियमावलीची दूरदर्शन केली आहे यासंदर्भात धर्मादाय आयुक्त सातारा यांनी तात्काळ अध्यक्षांसहित सेक्रेटरी यांना पदावरून रिक्त करावे व संस्थेच्या कारभारावरती प्रशासक नेमावा अशी मागणी पांचगणी येथील वाल्मीक हाउसिंग सोसायटीचे संचालक संतोष चव्हाण यांनी केले आहे,

Categories: महाबळेश्वर

Related Posts

आकाशवाणी झोपडपट्टीतील पाण्याच्या टंचाई संदर्भात जीवन प्रधिकरणाच्या अधिकारी गडकरी यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार.

January 5, 2025

आकाशवाणी झोपडपट्टीतील पाण्याच्या टंचाई संदर्भात जीवन प्रधिकरणाच्या अधिकारी गडकरी यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार. प्रतिनिधी सातारा…

पांचगणी येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा चषक वितरण सोहळा राजेंद्र शेठ राजपुरे निलेश गोळे शेखर कासुर्डे प्रकाश गोळे अंकुश आबा मालुसरे वसंतराव बिरामणे यांच्या सहप्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अखेर संपन्न…..!

January 12, 2025

प्रतिनिधी पांचगणी पांचगणी येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा चषक वितरण सोहळा राजेंद्र शेठ राजपुरे निलेश गोळे शेखर कासुर्डे प्रकाश गोळे अंकुश…