वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल खराडे पाटील  घरी आरोपी निसटण्याची स्टोरी महिना होत आला तरी पिढीत न्यायाच्या प्रतीक्षेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागातील बलात्कारातील आरोपी समीर संकपाळ अद्याप मोकाटच पोलिसांची हाताची घडी तोंडावरती बोट का..?



महाबळेश्वर प्रतिनिधी*
*अनमोल कांबळे*

महिन्याभरापूर्वी लग्नाचे आम्हीशी दाखवून दलित मुली वरती वारंवार बलात्कार करणाऱ्या व गर्भपात करून मुलीचे आयुष्य उध्वस्त करणारा  शिवसेनेच्या माजी उपजिल्हा प्रमुख कै हरिभाऊ संपकाळ यांचे चिरंजीव समीर संपकाळ हा अद्याप उपविभागीय पोलीस अधिकारी वाई शितल जानवे खराडे पाटील यांच्या हाताला लागलेला नसून पोलीस तपासामध्ये हलगर्जीपणा करत असल्याचे चित्र समोर येत आहे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागातील माजी आमदार दगडू दादा संपकाळ यांचे पुतणे व कैलासवासी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख  हरिभाऊ संपकाळ यांचे चिरंजीव समीर संकपाळ हे बलात्कार व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात फरार असून व याचा कसून तपास वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी करत असून अद्याप उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे खराडे पाटील यांच्याच हाती आरोपी लागलेला नसून तुम्ही मोक्यातील आरोपी शोधून काढता परंतु बलात्कारातील आणि दलित मुली वरती अत्याचार करणारा आरोपी तुम्हाला भेटत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आरोपी हा माजी आमदार दगडू दादा संपकाळ यांच्या घरातला आहे म्हणून पोलीस कारवाई करत नाहीत का? असा असणारा प्रश्न इथे उपस्थित होतो  आरोपीचा भाऊ हा स्पष्टपणे पाचगणी पोलीस स्टेशनला हजर होतो पोलीस स्टेशनमध्ये पीडितेला लिहून देतो की मी तुझे लग्न माझ्या भावासोबत करीन आणि हे लिहून दिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की आरोपीचा भाव देखील या गुन्ह्यात सहभागी आहे आणि म्हणून आरोपीच्या भावाच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत परंतु वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे खराडे पाटील या कुठल्याही प्रकारची कारवाई करत असतानाचे चित्र दिसुन येत नाही. आरोपीच्या अथवा आरोपीला मदत करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या जाणार का. ?