सांभाला रिसॉर्टला ला सांभाळून घेण्याच्या यादीतून वगळले?तहसीलदार सुषमा पाटील यांच्या कारवाईकडे संशयाची सुई भिलार येथील सर्व्हे नंबर 9/ मध्ये पदाचा गैरवापर करून उभारलेल्या राजवाड्यावरती कारवाई का नाही? अनमोल कांबळे

सांभाला रिसॉर्टला ला सांभाळून घेण्याच्या यादीतून वगळले?तहसीलदार सुषमा पाटील यांच्या कारवाईकडे संशयाची सुई भिलार येथील सर्व्हे नंबर 9/ मध्ये पदाचा गैरवापर करून उभारलेल्या राजवाड्यावरती कारवाई का नाही? अनमोल कांबळे

April 7, 2023 | महाबळेश्वर

महाबळेश्वर प्रतिनिधी….

मेटगुताड येथे डोंगर उतारावर बांधण्यात आलेल्या सांभाला रिसॉर्टला महसूल विभागाने जिल्हाधिकारी यांच्या अनधिकृत विनापरवाना बांधकाम आदेशानुसार टाळे ठोकले आहे, त्याबद्दल बेकायदेशीर गोष्टीला लगाम घातल्याचे काम तहसीलदार सुषमा पाटील यांनी जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांचा आदेश आल्यानंतर त्याचे पालन केल्यामुळे त्याचे अभिनंदनच करतो परंतु तहसीलदारांनी केवळ कारवाई करण्याकरिता माणसे नेमली आहेत की काय ? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तहसीलदारांच्या कारवाईकडे आता संपूर्ण तालुक्याचे नाहीतर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे एकीकडे बाहेरून आलेल्या सर्वसामान्य व्यवसायिक अथवा सुखवस्तू उपभोगणाऱ्या वरती तहसीलदार कारवाई करतात त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच परंतु पैशाचा आणि पदाचा गैर वापर करून मौजे भिलार ता महाबळेश्वर येथील सर्व्हे नंबर 9/ मध्ये माजी मुंबई पोलीस उपयुक्त संजय मोहन कांबळे यांनी आपल्या पदाचा आणि पैशाचा गैरवापर करत आपल्या घरातला सदस्य हा मौजे भिलार ग्रामपंचायत सदस्य असल्याने राजकीय पाठबळ बाळगत प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन करून राजवाडा उभारण्याच काम केल इतकच काय तर तहसीलदारांच्या डोळ्यासमोर विहीर खोदली गेली विहिरीचा पंचनामा हा मा. गावकामगार तलाठी वणवे मा.सर्कल ढगे यांनी संबंधित बेकायदेशीर बांधकामांचा पंचनामा करत असताना विहिरीचा पंचनामा केलाच नाही, याचे कारण इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचे उल्लंघन करणारा व्यक्ती हा शासकीय अधिकारी होता म्हणूनच तहसीलदार सुषमा पाटील तलाठी वनवे सर्कल ढगे हे हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन गप्प बसले होते परंतु उपविभागीय अधिकारी वाई जाधव यांनी संबंधित राजवाडा पाडण्याचे आदेश तहसीलदारांना दिले असताना सुद्धा तहसीलदार सुषमा पाटील यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई ही संबंधित राजवाड्यावरती केलेली नव्हती आता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झाले बेकायदेशीर बांधकामे पाडा सिल करा तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई ही तहसीलदार या मौजे भिलार येथील सर्वे नंबर ९/ मध्ये असणाऱ्या बांधकामावरती करत नाहीत म्हणजे गौड बंगाल नक्की दडलय तरी कुठे याचा पडदा फास्ट करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, चालू अनधिकृत बांधकामे आजही आदेशाला केराची टोपली दाखवत चालू आहेत ती पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत का? तहसीलदार सुषमा पाटील यांची कारवाई ही बोगस आणि दिखावा असणारी कारवाई आहे, माणसे नेमून बेरीज वजाबाकी करूनच कारवाई केली जात आहे, आणि म्हणून याचा निषेधार्थ आम्ही येत्या आठ दिवसांमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करुन करणार आहोत असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,

Categories: महाबळेश्वर

Related Posts

गिरीश दापकेकर यांना प्रदान झालेला पुरस्कार बोगस? दापकेकरांची प्रतिमा ही नशेमध्ये गुंग होऊन बारमध्ये मुलींसोबत अश्लील चाळे करणारे बेवडे अधिकारी म्हणूनच आता तरी सुधरा अन्यथा गळ्यामध्ये कोल्हापुरी चपलांचा हार घालून सन्मान करू महेंद्र सपकाळ

March 29, 2023

सातारा प्रतिनिधी पाचगणी शहरातील विकास कामांनसह नागरी सुविधा व कोरोना काळामध्ये केलेल्या कार्याबद्दल पाचगणी नगर परिषदेचे मुख्यअधिकारी गिरीश दापकेकर यांना…

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदार सुषमा पाटील यांची धडाकेबाज एन्ट्री तर दुसरीकडे मुख्याधिकारी पल्लवी पाटील आणि गिरीश दापकेकर यांची आदेशाच्या अंमलबजावणीला नो एंट्री…?

April 12, 2023

प्रतिनिधीअनमोल कांबळे देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा व थंड हवेचे ठिकाण मानला जाणारा संपूर्ण महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन मानला…