लढा महाराष्ट्र च्या बातमीचा अखेर दणका राजपुरी येथील टेबल लँड च्या पायथ्याशी बेकायदेशीरीत्या हजारो ब्रास उत्खनन करून बांधकाम करणाऱ्या राजवाड्याचा अखेर पंचनामा पूर्ण पुढील कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात पंचनामा पाठवला..!



लढा महाराष्ट्र च्या बातमीचा अखेर दणका राजपुरी येथील टेबल लँड च्या पायथ्याशी बेकायदेशीरीत्या हजारो ब्रास उत्खनन करून बांधकाम करणाऱ्या राजवाड्याचा अखेर पंचनामा पूर्ण पुढील कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात पंचनामा पाठवला.

प्रतिनिधी अनमोल कांबळे

प्रशासनाला मूर्ख समजत काही मलई खाणाऱ्या महसुली अधिकाऱ्यांच्या जीवावरती आपल्या पैशाची ताकद दाखवत राजपूरी येथील टेबल लँड च्या पायथ्याशी वन सदृश्य क्षेत्रामध्ये बेकायदेशीर राजवाडा उभारणाऱ्या व कृषी पर्यटनाच्या नावावरती शासनाची दिशाभूल करत फॉरेस्ट जागेमध्ये वनसदृश्य क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर राजवाडा वरणाऱ्या व लाखो रुपयांन करिता शासनाची फसवणूक करणऱ्यांचे धाडस दाखवणाऱ्या त्या खणन माफियाला लढा महाराष्ट्राच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाने चांगलाच दणका दिला असल्याचे पाहायला मिळाले गाव कामगार तलाठी सुदाम मामीलावाढ यांनी सांगितले आज रोजी संपूर्ण बेकायदेशीर बांधकामाचा व उत्खननाचा पंचनामा पूर्ण केला असून तो वरिष्ठ कार्यालयात पुढील कारवाई करण्याकरिता पाठवण्यात आला आहे, या पंचनाम्यात नक्की दडलय तरी काय हे अद्याप समोर जरी आले नसले तरी मात्र प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत या राजकीय वर्धा हस्त असणाऱ्या धनदांडग्याचे बेकायदेशीर पितळ बाहेर काढण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झाले असल्याचे निदर्शनास आले असल्याने राजपुरी येथील काही ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे आता बघायचे हे आहे की वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून इतर बांधकामांप्रमाणे या बेकायदेशीर बांधकामावरती प्रशासन कधी हातोडा उचलणार की पुन्हा एकदा चिरीमिरी कारवाई करून संबंधिताला राजवाडा उभारण्यास अभय देणार ? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.