राष्ट्रवादीचे नेते कै बाळासाहेब भिलारे यांच्या स्वप्नातील घराणेशाही बंद करून सर्व सामान्य कार्यकर्त्याचा सन्मांन करण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरणार का? राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या निर्णयाकडे महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष
July 29, 2022 | महाबळेश्वर
प्रतिनिधी*
*अनमोल कांबळे*
जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकताच संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झालेल्या दिसून येत आहेत प्रत्येक जण आपण पाच वर्षांमध्ये सर्वसामान्य लोकांकरिता केलेली कामे आणि त्या कामातून आता लोकांकडून पोचपावती मिळवणे गरजेचे आहे असे ध्येय बाळगत असून पोचपावती मिळवत असताना जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्यामुळे कै बाळासाहेब भिलारे यांच्या स्वप्नातील घराणेशाही बंद होऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान होणार का? याकडे संपूर्ण तालुक्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे, महाबळेश्वर तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा झेंडा हा कुणाच्या खांद्यावरती पडणार व तो फडकवण्यासाठी कोणाची वर्णी लावणार याच्याकडे संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले दिसून येत आहे तीव्र झालेल्या दिसत आहेत कार्यकर्त्यांच्या भावना घराणे शाही नको, तर सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान होणे गरजेचे आहे अहोरात्र मेहनत करून पक्षासाठी पळणाऱ्या सर्वसामान्यांच्या हाकेला अर्ध्या रात्री धावत येणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान होणे गरजेचे आहे याकरिता राष्ट्रवादी हा झेंडा कोणाच्या हातामध्ये देणार ?? व तो कोण फडकवणार हे चित्र काही दिवसातच आता स्पष्ट होईल, परंतु घराणेशाही नको, तर सर्वसामान्य सन्मान होणे गरजेचे आहे, या कार्यकर्त्यांच्या भावनांकडे राष्ट्रवादी लक्ष देणार की? एकतर्फी निर्णय घेऊन पुन्हा घराणे शाही निर्माण करणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले दिसत आहे,
Categories: महाबळेश्वर
Related Posts
बाहेरून येऊन महाबळेश्वर मधील इतिहासकालीन पॉईंट ची नावे बदलण्याचा प्रयत्न केल्यास होणाऱ्या सर्व परिणामास प्रशासन जबाबदार असेल- किरण शिंदे
July 29, 2022
*प्रतिनिधी**अनमोल कांबळे* महाबळेश्वर बचाव आघाडीचे प्रमुख किरण शिंदे यांनी खळबळ जनक वक्तव्य करून सर्वांच्या भवळ्या उंचावण्याचं काम केलं आहे दोन…
किती दिवस सोसायची ही घोर राजकीय नाकेबंदी…मरेपर्यंत राहायचे का असेच जातीबंदी
July 30, 2022
महाबळेश्वर प्रतिनिधी…दिनांक ३०-७-२०२२ सार्वत्रिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नुकतेच राज्यभर आरक्षण जाहीर झाले आहे आणि आरक्षण जाहीर होताच कहीं…
