पर्यटन विभागाच्या आई योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे महिला सक्षमीकरणाचा विचार तालुक्यातील घराघरात पोहोचवा महिला दिनानिमित्त राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना.!



प्रतिनिधी अनमोल कांबळे

पर्यटन विभागाच्या आई योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे महिला सक्षमीकरणाचा विचार तालुक्यातील घराघरात पोहोचवा महिला दिनानिमित्त राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना..

महाबळेश्वर तालुका हा अत्यंत संवेदनशील तालुका आहे पर्यावरण पूरक तालुका आहे निसर्गाने हरभरलेला तालुका आहे, अशा परिस्थितीमध्ये सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील घराघरातली महिला ही आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून कर्तृत्वाच्या माध्यमातून स्वबळावरती सक्षम झाली पाहिजे हा आमचा मुख्य विचार आहे या विचाराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने पर्यटन विभागाच्या माध्यमातून आई योजना राबवलेली आहे, या आई योजनेचा लाभ तालुक्यातील प्रत्येक महिलेने व्यवसायाकरिता घ्यावा व एक आदर्श व्यावसायिक म्हणून या तालुक्याचे नाव उज्वल करावे हे आमचे मुख्य धोरण आहे, व मला विश्वास आहे की महाराष्ट्र शासनाने पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबवलेली आई योजनेचा लाभ हा या महिला दिनानिमित्त तालुक्यातील सर्व महिला घेतील व महाबळेश्वर तालुक्यातील एक आदर्श व्यावसायिक म्हणून नवनवीन उद्योजक महिला या तालुक्यामध्ये घडतील असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक व महाबळेश्वर तालुक्याचे युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.