लढा महाराष्ट्राच्या बातमीने खड्डे मुजवण्याच्या कामाला गती मात्र डांबराचा वापर कमीच-अनमोल कांबळे



लढा महाराष्ट्राच्या बातमीने खड्डे मुजवण्याच्या कामाला गती मात्र डांबराचा वापर कमीच अनमोल कांबळे,

प्रतिनिधी
किरण अडसूळ

दिं 14/10/2023/ रोजी च्या बातमीने महाबळेश्वर मधील बांधकाम विभागाला खडबडून जाग आल्याचे चित्र दिसून येत आहे खड्डे मोजण्याचे काम पाचगणी हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात चालू झाले आहे, मात्र काम चालू झाले यंत्रणा सतर्क झाली परंतु कामांमध्ये निष्काळची दर्जाचा पणा हा आजही आम्हाला जाणवत आहे योग्य दर्जाच्या कामाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात होणारा ग्रिटचा मारा आणि कमी प्रमाणात होणारा डांबराचा वापर हे निष्काळीची दर्जाच्या कामाचे प्रतीक आहे याची अभियंतांनी तात्काळ दखल घ्यावी, शासन कोट्यावधी रुपये खर्च करत मग हे पैसे जात्यात कोणाच्या खिशात अशाप्रकारे निष्काळाची दर्जाची जर का कामे मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यांमध्येच होत असतील तर इतर ठिकाणची परिस्थिती काय असेल या संदर्भातली झडती अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री गावाला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घ्यावी कमी डांबराचा वापर कशासाठी पुन्हा रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता टाकण्यासाठी ही युक्ती लढवली जात आहे, की काय? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे, आम्हाला अभिमान आहे की शासन सतर्क आहे दिनांक 14/10/2023 रोजी लढा महाराष्ट्रा चा या पोर्टलच्या माध्यमातून महाबळेश्वर तालुक्यातील खड्ड्यांचे वास्तव मांडलं गेलं आणि सुस्त झालेल्या प्रशासनाला खडबडून जाग आली मुख्य बाजारपेठेतील रस्ते हे दुरुस्तीच्या मार्गावरती आले परंतु या दुरुस्तीला कुणाची नजर लागली आहे, की काय? की अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळेच ठेकेदार कमी डांबर वापरत आहे, की काय? याचे स्पष्टीकरण अभियंतांनी अथवा त्यांच्या वरिष्ठांनी द्यावे कमी डांबराचा वापर कशासाठी असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला असून येत्या दोन दिवसांमध्ये बांधकाम विभाग सातारा येथील मुख्य अभियंत्यांना भेटून निवेदन देखील देणारा असल्याचे अनमोल कांबळे यांनी सांगितले,