महाबळेश्वरच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावरती खड्डे मुजवण्यासाठी ठेका मात्र काम निष्काळजी दर्जाचे अभियंत्यानीं तात्काळ संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी अनमोल कांबळे.,



महाबळेश्वरच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावरती खड्डे मुजवण्यासाठी ठेका मात्र काम निष्काळजी दर्जाचे अभियंत्यानीं तात्काळ संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी अनमोल कांबळे.,

प्रतिनिधी
किरण अडसूळ

पाचगणी महाबळेश्वर मेन रोडला पावसाळ्यानंतर पडलेल्या खड्ड्यांचे साम्राज्य प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले असून खड्यांमध्ये पाचगणी महाबळेश्वर आहे की महाबळेश्वर पाचगणी मध्ये खड्डे असा असणारा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे, खड्डे पडले पावसाळ्यात की लगेचच बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी खड्डे मुजवण्याकरिता ठेका हा मर्जीतल्या ठेकेदाराला दिला असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये आहे मात्र ठेका घेणारा ठेकेदार हा नेहमीप्रमाणे आपल्या कामाशी प्रामाणिक राहून खड्डे मुक्त पाचगणी महाबळेश्वर करायला विसरला याचे प्रतीक बघायचे असेल तर इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही मुख्य पाचगणी पोलीस स्टेशन समोरच जणू खड्डे मुजवले आहेत की खड्डे खोदले आहेत हे तुम्हाला रोडची दशा पाहिल्यानंतर लक्षामध्ये येईल आणि इतकी भयानक परिस्थिती असताना देखील महाबळेश्वरच्या बांधकाम विभागाचे अभियंता अशा कुठल्या योजना राबवण्यात व्यस्त आहेत हे अभियंत्यांनी स्पष्ट करावे लोकांची गैरसोय करून निम शासकीय योजना राबविण्यात जर का अभियांते व्यस्त असतील तर व्यस्त काम बाजूला ठेवून तात्काळ ठेकेदाराच्या निष्काळजी दर्जाच्या कामाचे ऑडिट केलं पाहिजे आणि येत्या दहा दिवसात जर का निष्काळजी दर्जाच्या कामाचे अभियंत्यांनी ऑडिट केले नाही त्याच्या निष्काळजी कामावरती कारवाई केली नाही तर मात्र आम्हाला अभियंतांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करावे लागेल असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,