एकनाथ शिंदे गावी येताच प्रवीण भिलारे यांचे वक्तव्य महाबळेश्वर तालुका हा साहेबांच्या पाठीमागे महायुतीतील नेत्यांनी पुन्हा एकदा साहेबांच्या खांद्यावरती महाराष्ट्राची धुरा द्यावी साहेबच महाराष्ट्रला योग्यरित्या विकासाची दिशा देऊ शकतात.
प्रतिनिधी अनमोल कांबळे
महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र असणाऱ्या व संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बणलेल्या महाराष्ट्र राज्याचे विसावे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्याला एक संयमी शांत वडीलधारा आधार मुख्यमंत्र्यांच्या रूपाने मिळाला असल्याचे प्रवीण भिलारे यांनी सांगितले इतकच नाही तर 2024 लोकसभा विधानसभा निवडणूक पार पडताच आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार ? अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असतानाच्या मुहूर्तावरती एकनाथ शिंदे त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळ गावी आले असता महाबळेश्वर तालुक्याचे नेते जिल्हा नियोजन समिती सदस्य व एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे प्रवीण भिणारे यांनी कार्यकर्त्यांसमवेत काल महाबळेश्वर मध्ये वक्तव्य केले आहे, प्रवीण भिलारे म्हणले एकनाथ शिंदे साहेब हे या महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र आहेत, याचा आम्हा सर्व महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्रांना गर्व आहे, साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा साहेबांना काम सांगायची गरज पडत नव्हती साहेब कार्यकर्त्याकडे पाहूनच त्यांच्या काय समस्या आहेत ते जाणून घ्यायचे ही चाणक्य बुद्धी साहेबांकडे आहे, साहेबांमुळे महाबळेश्वर तालुक्याचा खऱ्या रूपाने विकास झाला आहे, कांदाटी खोर्यापासून वाघेऱ्यापर्यंत वाघेर्या पासून महाबळेश्वर पर्यंत माबळेश्वर तालुक्याच्या डोंगरी व दुर्गम भागात साहेबांनी लोकांच्या भावना समजून विकास केला हे साहेबांचे उपकार महाबळेश्वर तालुका कधीही विसरणार नाही, इतकच नाही तर अखंड महाराष्ट्राच्या लोकांवरती प्रेम करून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी केला याचा आम्ही महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र असल्याने आम्हाला गर्व आहे, जो कोणी एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नाराज होऊन गेला तो नेहमी हसतच आला आहे, हा असणारा साहेबांचा इतिहास आहे, इतर तालुक्यातील शहरातील गावातील नेत्याला स्थानिकांचा विरोध असतो मात्र एकनाथ शिंदे हे या राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांच्या पाठीमागे 100% तालुक्यातील जनता खंबीरपणे उभी आहे, कधीही साहेबांच्या विरुद्ध एक वाक्या सुद्धा न बोलणारी ही महाबळेश्वर तालुक्यातील जनता आता बोलू लागली आहे, या राज्याचे नव्याने मुख्यमंत्री हे आमचे साहेबच व्हावेत व हा आमचा सर्वांचा एक मुखाने महायुतीला आग्रह आहे, की पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य हे एक मुखाने विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचे असेल तर एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा व या संदर्भात महायुतीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना आपण पत्रव्यवहार देखील करणार आहोत असे महाबळेश्वर तालुक्याचे नेते प्रवीण भिलारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

