पाचगणी हद्दीतील स्वयं प्रभा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहरातील मतदानातून वृक्षांचा नावलौकिक नामकरण उपक्रम कार्यक्रम साजरा
पाचगणी प्रतिनिधी
पाचगणी नगरपरिषद हद्दीतील स्वयं प्रभा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदानातून वृक्षांचा नावलौकिक नामांकन कार्यक्रम साजरा मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी निखिल जाधव यांच्या सह माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे माजी नगराध्यक्ष प्रवीण मेमन पाचगणी शहरातील युवा नेते प्रकाश गोळे (पत्रकार) (लेखक) अनमोल कांबळे सामाजिक कार्यकर्ते इम्रान शिरसागर सुरेश मडके गणेश कासुर्डे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला पाचगणी शहरातील नागरिकांसह शाळेतील मुलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसला स्वयंप्रभा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने पाचगणी नगरपरिषद मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या नावलौकिक कामाचा संस्थेच्या अध्यक्षा श्रद्धा दर्यापूरकर यांनी पाचगणी नगरपालिकेच्या कारभाराची दखल घेत निखिल जाधव यांच्या कामामुळे पाचगणीच्या स्वच्छतेचे व पाचगणी शहराचे नाव हे दिल्लीच्या तक्त्यापर्यंत पोहोचल्याने मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी निखिल जाधव यांचा संस्थेच्या अध्यक्ष श्रद्धा दर्यापूरकर यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन संस्थेच्या मार्फत मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा सन्मान करण्यात आला, तर माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे म्हणाले आम्ही पाचगणीच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहोत व पाचगणी शहराचा विकास कसा होईल याकडे भर देत आहोत, तर माजी नगराध्यक्ष प्रवीण मेमन म्हणाल्या जो विकास आमच्या कार्यकाळामध्ये झाला त्याच्यापेक्षा सुंदर विकास या शहराचा येत्या काळामध्ये आम्ही पुन्हा एकदा करू तर अनमोल कांबळे म्हणाले निवडणुकीनंतरच शहराच्या खऱ्या विकासाला चालना मिळेल., मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहरातील वृक्षांच्या मतदानातून वृक्षांचा नावलौकिक नामकरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्याचे चित्र सर्वत्र पाहिला मिळाले.,

