महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गण मध्ये आज अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सौ पूनम निलेश गोळे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. माझं काम विचार आणि धाडस हेच माझं शक्तिप्रदर्शन….!



प्रतिनिधी पांचगणी 

महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गण मध्ये आज अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सौ पूनम निलेश गोळे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. माझं काम विचार आणि धाडस हेच माझं शक्तिप्रदर्शन….

भिलार पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून

प्रतिक्रिया देताना म्हटल्या आहेत

माझी उमेदवारी आणि माझा निवडणूक लढवण्याचा निर्णय हा प्रत्येक मतदाराच्या हितार्थ आहे ज्या मतदारांना गृहीत धरलं जात होत त्या सर्वच मतदारांना मी उमेदवारी जाहीर केल्यापासून कितीतरी प्रस्थापित लोकांकडून प्रत्येकाची विचारपूस केली जात आहे आणि हीच माझी ताकद की इथला प्रत्येक मतदार हा फक्त मतदार नाही तर मतदार राजा आहे मतदारांनाही फरक जाणवत आहे माहिती घ्या.

उमेदवारी आणि पद राजकारण हा माझा व्यवसाय नाही मला त्याची आवश्यकता नाही पण निस्वार्थ आपलं अनमोल मत देणाऱ्या मतदाराला तुम्ही विचारातच घेत नाही हे चित्र बदललं पाहिजे माझ्यामुळे मतदारांच महत्व प्रथमच या निवडणुकीत प्रभावी ठरणार आहे.