पाचगणी प्रतिनिधी…
मौजे दांडेघर ता महाबळेश्वर येथील दांडेघर गावातील 110 ग्रामस्थ यांनी 25 सप्टेंबर पासून चालू केलेला गाव विकल्याचा बनाव अद्याप संपुष्टात येत नसल्याचे चित्र दिसत आहे कसलाही अधिकृत पुरावा नसताना दांडेघर ग्रामस्थांनी 25 सप्टेंबर रोजी पाचगणी पोलीस ठाण्यात निवेदन दिले की पूनम कांबळे व इतर 3 अशा चार लोकांनी गाव विकला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी मात्र गाव कामगार तलाठी यांनी अशी कोणतीही घटना घडली नाही व शासकीय रेकॉर्ड वर कोणतीच माहिती अद्याप तरी उपलब्ध नाही असे लेखी पत्र दिले तसेच पोलीस ठाण्यातही पूनम कांबळे सह सर्वांचे जबाब नोंदविले आहेत
जर यात काहीच तथ्य नाही तर हा गाव विकल्याचा आरोप का करण्यात आला हा संशोधनाचा विषय आहे मात्र या निवेदनात दांडेघर गावच्या पोलिस पाटील शासकीय प्रतिनिधी म्हणून जे गावातील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम बजावत असतात तेच रक्षक भक्षक होयला लागले आहेत आणि म्हणून पोलीस पाटील योगिता खरात या इतक्या गंभीर बनावात सहभागी झाल्याप्रकर्णी त्यांचे पोलीस पाटील पद रद्द करण्यात यावे यावरून कळते त्या पदास पात्र नाहीत व त्या लोकशाहीस घातक काम करत आहेत त्यांच्या एका नाटकामुळे अज्ञाना मुळे बेजबाबदार हलगर्जीपणा मुळे घातपात दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो यापूर्वी ही मोर्चे आंदोलने असे प्रकार दबावतंत्राचा वापर आरोपींन कडून करण्यात आलेला आहे म्हणून यांना या पदावर कार्यरत राहण्याचा अधिकार नाही त्यांना पदमुक्त करावे असे निवेदन उपविभागीय अधिकारी उपविभाग वाई यांना पूनम कांबळे(गोळे) यांनी दिले आहे ....

