पॅराग्लायडिंग करत असताना हरणेस घालण्याच्या माध्यमातून अश्लील प्रकार वाढले मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 10/ मधील प्रकार पोलीस अधीक्षक समीर शेख स्वतः कारवाई करणार का ? याकडे लक्ष,



प्रतिनिधी अनमोल कांबळे

मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 10/ मध्ये पॅराग्लायडिंग करण्याकरिता स्थानिक प्रशासनाची कुठली परवानगी न घेता केवळ खोटी एनओसी जोडून पर्यटन विभागाची दिशाभूल करून प्रशिक्षण पत्र मिळवलेल्या पॅराग्लायडिंग करणाऱ्या यंत्रणे कडून आता तर चक्क 14 / वर्षातील मुलींसोबत हरणेस घालण्याच्या माध्यमातून अश्लील प्रकार घडल्याच्या घटना समोर येत आहेत, पाचगणी पोलिसांनी काही मिनिटात लाखो रुपये कमवून देणारा पॅराग्लायडिंग सारखा आयोजित करणाऱ्यां खेळाला न हरकत दाखला देत असताना हा खेळ ज्या ठिकाणी आयोजित केला जाईल त्या ठिकाणी 14/ वर्षा आतील मुलींना फ्लाईंग करायची असल्यास त्यांच्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने मेसेज पाठवणे बंधनकारक राहणार आहे, ज्या ठिकाणी हा जीवघेणा खेळ चालू आहे त्या ठिकाणी ॲम्बुलन्स असणे गरजेची आहे त्या ठिकाणी डॉक्टर असणे गरजेचे आहे, व अन्य कठोर नियम नियमांची अंमलबजावणी करणे गरजेची आहे
परंतु काही मिनिटातच लाखो रुपये कमवून देणाऱ्या या जीवघेणा खेळामध्ये असा कुठल्याही प्रकारचा नियम पॅराग्लायडिंग आयोजकांनी नियमित केलेला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे उलट दादागिरीच्या आणि गावगुंडांच्या जोरावरती पोलिसांशी संगणमत करून या ठिकाणी फ्लाईंग जोमात चालू असल्याचे पाहायला मिळत आहे व याचाच फायदा घेत मै खडा तो पोलीस से बडा हे धोरण राबवून पाचगणीतील संपूर्ण पोलीस यंत्रणा पैशाच्या ताकदीवरती खिशामध्ये ठेवून आयोजकांनी मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 10/हॉरीसन फॉली थापा पॉइंट या ठिकाणी मूळ मालकाची परवानगी न घेता व ग्रामपंचायत ची कुठलीही परवानगी न घेता केवळ पोलिसांशी हात मिळवणी करून राजरोसपणे आपला व्यवसायाच्या माध्यमातून आता पर्यटकांशी पॅराग्लाइडिंगच्या माध्यमातून अश्लील प्रकार करण्याचे धाडस या पॅराग्लाइडिंग करणाऱ्या आयोजकांनी सुरू केलेल आहे, व हे सुरू केले असल्याने स्वतः सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक समीर शेख हे स्वतः या प्रकरणांमध्ये लक्ष घालून काही मिनिटात लाखो रुपये कमवून देणाऱ्या या जीवघेणा खेळाबद्दल व पर्यटकांच्या मुलींची अश्लील चाळे करणाऱ्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करणार का? असा असणारा प्रश्न आता उद्भवलेला आहे,